इतरधार्मिक

ह.भ.प. नितीन महाराज गोडसे पसायदान पुरस्काराने सन्मानित

कोतुळ प्रतिनिधी

अध्यात्मिक धर्मिक व वारकरी संप्रदायातील उल्लेखनीय कार्याबद्दल कोतुळ (ता. अकोले) येथील कोतुळेश्वर वारकरी  शिक्षण संस्थेचे संस्थापक हभप नितीन महाराज गोडसे यांना यावर्षीच्या पसायदान पुरस्काराने डॉ. अरविंद रसाळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

शाल श्रीफळ सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. हा सोहळा निभाळे ता. संगमनेर येथे प्रा. निलेश परबत यांच्या संकल्पनेतून गेली बारा वर्षे आयोजित केला जात आहे.यावेळी महाराष्ट्रातील पहिल्या नाभिक महिला शांताबाई यादव,महाराष्ट्रातील पहिल्या महिला रिक्षा चालक मंगल आवळे, मुलाखतकार संतोष खेडेकर, अरविंद रसाळ अमृत उद्योग समूहाचे अध्यक्ष तुषार शिंदे, डॉ.नीलिमा निघूते, एकनाथराव ढाकणे, मधुकर सोनुले, सागर सोनले, आदी मान्यवर उपस्थित होते.

ह भ प नितीन महाराज गोडसे हे कोतुळ येथे कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने वारकरी संप्रदायाचे शिक्षण देतात या संस्थेत सत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांनी तयार केलेले अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध भागात वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचार करीत आहे. या पुरस्काराबद्दल हभप नितीन महाराज गोडसे यांचे समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख, अगस्ती देवस्थानचे अध्यक्ष अधिवक्ता के. डी.धुमाळ, कोतुळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कोते,मूळमाता देवस्थानचे अध्यक्ष व आगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सिताराम गायकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सिताराम देशमुख, माजी प्रशासकीय अधिकारी बी. जे. देशमुख, हेमंत देशमुख, माजी उपसरपंच राजेंद्र देशमुख, कुलदीप नेवासकर,मुकुंद बो-हाडे, रेवन्नाथ देशमुख, रमेश देशमुख,आदींनी अभिनंदन केले आहे.

————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button