इतर

उज्वल भविष्यासाठी गरूड झेप महत्वाची – प्रा.डॉ.राजेंद्र लड्डा

संगमनेर – प्रतिनिधी – मिळविलेल्या ज्ञानाच्या आधारे भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न करा. पण हे करत असतांना तुमची गरूड झेप महत्वाची असल्याचे मत शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर चे नवनिर्वाचीत सचिव प्रा.डॉ.राजेंद्र लड्डा यांनी व्यक्त केले.

महेश सत्संग मंडळ, संगमनेर आयोजीत सत्कार समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर माहेश्‍वरी पंच ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत (बाळासाहेब) कासट, संगमनेर माहेश्‍वरी समाजाचे अध्यक्ष संजय आर. मालपाणी, महेश सत्संग मंडळाचे अध्यक्ष सतीश लाहोटी हे उपस्थित होते.

प्रा.डॉ.लड्डा पुढे म्हणाले कि, मुर्तीकार ज्याप्रमाणे दगडातुन सुंदर मुर्तीला घडवितो, त्याप्रमाणे तुमचा मुर्तीकार चांगला पाहिजे. म्हणजेच सकारात्मक विचारांच्या समुहासह रहा, त्यांच्या विचारांचे आचरण करून भविष्य घडवा. तुम्हाला स्वारस्य असलेल्या क्षेत्रात पूर्णपणे झोकुन काम केल्यास तुम्हाला निश्‍चितच चांगले यश मिळुन भविष्य उज्वल होईल असेही ते म्हणाले.

यावेळी 10 वी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले श्‍लोक कासट, समृद्धी भुतडा, अनय चांडक, युग भंडारी, स्वरूप सोमाणी, हृदया सोमाणी, देवश्री लाहोटी, श्‍लोक बाहेती, पलक मणियार, 12 वी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले आदित्य भुतडा, दीप पडतानी, अनुष्का चांडक, पार्थ अट्टल, हर्ष बुब, अवनी कासट, नेटबॉल मध्ये नावलौकीक प्राप्त केलेली नंदिनी मुंदडा, यांचेसह भारताच्या 50 यशस्वी उद्योजकामध्ये सन्मानित झालेला इमॅजीका वल्ड चे व्यवस्थापकीय संचालक जय मालपाणी, जेईई अ‍ॅडव्हान्स मध्ये विशेष यश संपादन केलेली राशी बाहेती, कतार (सौदी अरेबिया) च्या एअरलाईन्स मध्ये पायलट म्हणून नियुक्त झालेला स्वप्निल बाहेती, बी फार्म मध्ये रॅकींग मध्ये तसेच पोर्टेबल कंडेन्सर कुलर च्या संशोधनासाठी पेटंट प्राप्त करणारा राजतिलक लड्डा, मास्टर इन फिजीओथेरपी प्रिती आसावा, नीट परिक्षेत देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये 3000 वा क्रमांकत प्राप्त करणारी एमबीबीएस मास्टर इन पीजी ची विद्यार्थीनी डॉ. साक्षी चांडक, इंटरनॅशनल मॅथॅमॅटिक ऑलंपियाड मध्ये राज्यात 7 वा क्रमांक मिळविणारी आदिती सोमाणी, बी.टेक यश भुतडा तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे संचालक श्रीनिवास भंडारी, अहिल्यानगर जिल्हा माहेश्‍वरी सभेचे कोषाध्यक्ष कुशावर्त कासट, संगठन मंत्री हरिकिसन चांडक, प्रशासकीय समिती सदस्य प्रकाश कलंत्री यांना देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

महेश सत्संग मंडळाचे अध्यक्ष सतीश लाहोटी यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविकात सांगितले कि, मंडळ विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम राबवत तर असतेच, त्याचबरोबर माहेश्‍वरी संस्कृती जोपासणार्‍या सर्व उपक्रमाचे देखील आयोजन करते. त्यालाच जोड म्हणून शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात नावलौकीक मिळविणार्‍यांचा यथोचित सत्कार देखील मंडळाच्या वतीने करण्यात येतो, त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानुन, पाहुण्यांचा परिचय प्रा. सचिन बाहेती यांनी करून दिला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अध्यक्ष सतीश लाहोटी, सचिव आशिष राठी,
उपाध्यक्ष निशांत जाजू, सह खजिनदार अमित चांडक, खजिनदार नंदुकाका झंवर यांचे सह ओंकारनाथ राठी, सतिषकुमार बाहेती, बसंत काका मणियार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button