आजचे पंचांग व राशिभविष्य दि ०६/०५/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १६ शके १९४४
दिनांक :- ०६/०५/२०२२,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५१,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति १२:३३,
नक्षत्र :- आर्द्रा समाप्ति ०९:२०,
योग :- धृति समाप्ति १९:०६,
करण :- कौलव समाप्ति २५:४७,
चंद्र राशि :- मिथुन,
रविराशि – नक्षत्र :- मेष – भरणी,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:५० ते १२:२६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:३७ ते ०९:१३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:१३ ते १०:५० पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:२६ ते ०२:०२ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
श्री आद्य शंकराचार्य जयंती, घबाड १२:३३ नं., षष्ठी श्राद्ध,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १६ शके १९४४
दिनांक = ०६/०५/२०२२
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. भावंडांचा प्रेमळ सहवास लाभेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मध्यस्थीच्या कामातून लाभ होईल. आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल.
वृषभ
आवक जावक यांचा मेळ जुळवावा. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. कुटुंबात तुमचा दबदबा राहील. कामात काही अनपेक्षित बदल संभवतात. घरगुती प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यावे.
मिथुन
कोणत्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. फसवणुकीपासून सावध रहा. गप्पा गोष्टी करण्यात वेळ घालवाल. अघळ पघळ बोलणे टाळा. इतरांचा तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो.
कर्क
मानसिक चंचलतेला आवर घालावी. घरासाठी काही मोठ्या वस्तु खरेदी कराल. मानाच्या व्यक्तींची गाठ पडेल. प्रकृतीबाबत हयगय करू नका. उष्णतेचे त्रास संभवतात.
सिंह
केलेल्या कामातून समाधान मिळेल. नवीन मित्र जोडाल. खूप दिवसांनी जुने मित्र भेटतील. पत्नीशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. अपचनाचा त्रास जाणवेल.
कन्या
कामाची एकाच धांदल उडेल. योग्य व्यवस्थापनावर भर द्यावा. कमिशन मधून चांगला लाभ मिळेल. इतरांचा विश्वास संपादन करावा. कौटुंबिक सौख्यात भर पडेल.
तूळ
अडथळ्यातून मार्ग काढता येईल. दिरंगाई झाले तरी कामे पूर्ण होतील. मित्रांच्या मदतीचा लाभ होईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल.
वृश्चिक
मनातील निराशा झटकून टाका. सकारात्मक विचारांची कास धरावी. कौटुंबिक गोष्टींमध्ये लक्ष घाला. कामाचा व्याप वाढता राहील. हातातील कामे पूर्ण होतील.
धनू
मनातील चुकीचे विचार दूर सारावेत. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी सलोखा वाढवावा. खर्चाचे प्रमाण आटोपते ठेवावे. जोडीदाराशी सल्ला मसलत करावी.
मकर
कामात आळस आड आणू देऊ नका. जवळचे नातेवाईक भेटतील. इतरांचा विश्वास संपादन करावा. हाताखालील लोकांवर बारीक लक्ष ठेवावे. कुणावरही चटकन विश्वास टाकू नका.
कुंभ
तब्येतीच्या तक्रारींकडे वेळीच लक्ष द्या. गरज नसेल तर प्रवास करू नये. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्यात दिवस खेळीमेळीत जाईल.
मीन
सामुदायिक वादापासून दूर राहावे. स्त्री वर्गापासून हानी संभवते. व्यावसायिक लाभाने संतुष्ट राहाल. उत्तम गृह सौख्या लाभेल. मित्रांबाबतचे गैर समज दूर होतील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर