अहमदनगर

शेंडी येथे आता सी. सी. टीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच!

संजय महानोर

भंडारदरा / प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्याची पर्यटन पंढरी म्हणून ओळख असणा-या भंडारदरा धरणाच्या उशाला असणा-या शेंडी गावावर दिस-या डोळ्याची नजर असणार असुन एकुन गावामध्ये २५ कॅमेरे बसविण्यात आले असल्याने पर्यटकांच्या अतिउत्साहीपणाला यामुळे मुरड बसणार
आहे .


अकोले तालुक्यातील शेंडी हे भंडारदरा धरणाला अगदी खेटुन वसलेलं छोटसं टुमदार गाव . अगदी हाकेच्या अंतरावर धरण असल्याने पर्यटकांची कायम वर्दळ या गावाभोवती असते .याशिवाय शेंडी हे गाव नवगाव डांगाणाची बाजारपेठ समजली जाते .रोज खरेदी विक्री साठी आदिवासी बांधवांची या गावात ये – जा सुरु असते . पर्यटकांच्या निवासाची व्यवस्थाही या गावात मोठ्या प्रमाणात आहे .भंडारद-याचा संपुर्ण आनंद उपभोगण्यासाठी याच गावांवरुन चोहीकडे फिरावे लागते .त्यामुळे ब-याचदा तरुण फिरणारे अति उत्साही पर्यटक हुल्लडबाजी करत असतात.यातुनच आपापसात ब-याचदा बाचाबाची होते .ब-याचदा त्यातुनच हाणामारीचाही प्रसंगही उद्भवतो . ब-याचदा शेंडीमध्ये भुरट्या चो-यांचाही प्रसंग घडला आहे . मागील दोन वर्षापुर्वी काही मद्यधुंद तरुणांनी स्थानिक युवकांवरच चाकु हल्ला केला होता .या सा-या गोष्टीवर नियत्रंण मिळविण्यासाठी शेंडी गावचे विद्यमान संरपंच दिलीप भांगरे यांनी संपुर्ण शेंडी परीसर हा सी सी टी कॅमे-यामध्ये नजरबंद करण्याचा निर्णय घेतला .त्यासाठी त्यांना मोलाचे सहकार्य लाभले ते ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय जंगाले यांचे . शेंडी परिसरात दत्त मंदिर , पंचशिल चौक , ग्रामपंचायत परिसर , एम टी डी सी रोड अशा महत्वाच्या ठिकाणी एकुण २५ ठिकाणी सी सी टी व्ही बसविण्यात आले आहेत .या कॅमे-यामुळे गुन्हेगारीला वचक बसणार आहे . या कॅमे-यांचा पोलिस यंत्रणेलाही फायदा होणार आहे .


– शेंडी गाव भंडारदरा धरणाला अगदी खेटुन असल्याने दरवर्षी हजारो पर्यटक भंडारद-याला भेट देत असतात .साहजिकच शेंडीलाही पर्यटकांची कायम वर्दळ असते .पर्यटकांवर या सी सी टी व्ही मुळे ग्रामपंचायतला नियत्रंण ठेवणे सहज शक्य होणार आहे …..

श्री दिलीप भांगरे ,

सरपंच शेंडी ता अकोले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button