इतर

आबासाहेब काकडे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके

आपत्तीचा धैर्याने सामना करावा-कल्पेश भागवत


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी


आपत्तीचे वर्गीकरण तीन भागात केले जाते. नैसर्गिक, मानवनिर्मित,सामाजिक- नैसर्गिक आपत्ती अशा साधारणता आपत्तीचे प्रकार आहेत. कोणतीही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित अथवा सामाजिक आपत्ती ओढावल्यास विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता या आपत्तीचा धैर्याने सामना करावा असे प्रतिपादन क्रीडा शिक्षक कल्पेश भागवत यांनी केले.

त्यांनी आज आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवगाव येथे आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके दाखवले. यावेळी व्यासपीठावरून ते बोलत होते. पुढे बोलताना भागवत म्हणाले की बऱ्याच वेळा आपण विनाकारण गर्दी केल्यामुळे आपत्तीचे व्यवस्थापन करणे अवघड होऊन जाते.त्यांनी आपत्तीचे प्रकार व घ्यावयाची काळजी याची प्रात्यक्षिके दाखवली. पुढे बोलताना भागवत म्हणाले की प्रत्येकाच्या घरी प्रथमोपचार पेटी दर्शनी भागात असणे आवश्यक आहे त्यामध्ये प्रामुख्याने छोटी कात्री,अँटिसेप्टिक क्रीम किंवा लोशन, कापडी पट्टी, बँडेज, कापूस,आयोडीन,थर्मामीटर, पेट्रोलियम जेली,साबण इत्यादी साहित्य असणे आवश्यक आहे.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री संपत दसपुते होते. प्राचार्य दसपुते आपल्या अध्यक्षही भाषणात बोलताना म्हणाले की आपल्या दक्षतेमुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही वस्तूची उत्पादन व समाप्ती दिनांक पाहून घेणे अत्यावश्यक आहे, असे केल्यास आपण विविध आजारावर मात करू शकतो.

यावेळी त्यांनी आपत्कालीन क्रमांक ची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड, पर्यवेक्षक हरिश्चंद्र मडके,सुनील आव्हाड,अविनाश भागवत, रागिनी लबडे बापूसाहेब डमरे सहदेव साळवे, शितल गोरे, सागर देहाडराय,भाग्यश्री गडाख, रामदास पांढरे,पंढरीनाथ पल्हारे, किसनराव जाधव यांच्यासह सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश भागवत यांनी तर आभार विक्रम घुटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button