ताजनापुर लिफ्ट योजनेबाबत लोकप्रतिनिधींनी जनतेची दिशाभुल करू नये – हर्षदाताई काकडे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र. १ ही उपसासिंचन योजना बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या योजनेबाबत अभ्यास करूनच लोकप्रतिनिधींनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करायला हवा होता. अपूर्ण माहिती घेऊन जनतेची दिशाभूल करू नये असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सौ.हर्षदा काकडे यांनी मुंगी येथे केले.
शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे जनशक्ती विकास आघाडीच्या गणातील निवडक कार्यकर्त्यांचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब दसपुते हे होते तर कार्यक्रमासाठी जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे, महासचिव जगन्नाथ गावडे, सुरेश चौधरी, राजेंद्र पोटफोडे, अशोक ढाकणे, शामराव खरात, सचिन आधाट, दिलीप होळकर, पांडुरंग मिसाळ, उपसरपंच गुलाबराव गव्हाणे, चेअरमन बंडू मोरे, महादेव गव्हाणे, गोरक्ष गव्हाणे, पै.सतीश दसपुते, कारभारी खरात, बाबासाहेब मस्के, अकबर शेख, बाबासाहेब नरके, गणेश शिलेदार, गणेश होळकर, संजय गलांडे, हरिभाऊ चौधरी, महादेव कदम, कल्याण कदम, नवनाथ कंगणकर, संदीप जाधव, भाऊसाहेब घोटाळे, सुधाकर घोरपडे, रफिक शेख, सिराज शेख, रज्जाक शेख, अशोक भेरे, अमोल म्हस्के, बबन नारे, राजेंद्र बल्लाळ, भास्कर खंडागळे, दत्तात्रय औटी आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सौ.काकडे म्हणाल्या की, विद्यमान आमदारांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला की, ताजनापुर लिफ्ट टप्पा क्र.१ चे काम पूर्ण झालेले आहे. पण वस्तुस्थिती मात्र तशी नाही, योजना सध्या बंद आहे. या बंद योजनेमधून वरूर-आखेगावसह ९ गावातील पाझर तलाव, साठवण बंधारे भरून मिळावेत या मागणीसाठी २०२० पासून आम्ही शेतकऱ्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडून पाठपुरावा करत आहोत. दि.१२ मार्च रोजी देखील शरद पवार साहेबांसोबत याच विषयावर बैठक झाली असून ३ महिन्याच्या आत या योजनेचे फेरसर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. आम्ही पवार साहेबांना या विषयावर भेटलो म्हणून यांना योजना अपूर्ण आहे याची जाग आली का ? त्यामुळे विद्यमान आमदारांनी या योजनेचा व्यवस्थित अभ्यास करूनच याबाबत विधानभवनात प्रश्न उपस्थित करावा अन्यथा जनतेची दिशाभूल करू नये. त्यांच्या दुसऱ्या आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होत आला आहे मग ताजनापूर टप्पा २ चे काम अद्यापपर्यंत पूर्ण का झाले नाही ? त्यांना शेतकऱ्यांबाबत एवढाच पुळका तर त्यांचे सरकार असताना योजना का पूर्ण केली नाही. त्यामुळे आता येत्या जि.प.व पं.सं. निवडणूकीत जनशक्ती सर्व जागा स्वबळावर लढवून कार्यकर्त्यांना बळ देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.