लग्न सोहळात वासुदेवाच्या नृत्याचा व-हाडी नी घेतला आनंद!

संजय महाजन
:धुळे शहरात नुकताच माळी आहिरे परिवारात एक आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला. यात नाताळ निमित्ताने वासुदेव आगमन व त्याचे नृत्य , निमंत्रित अंध विध्यार्थिनींनी उपस्थित राहून लग्नाचा घेतलेला आनंद ,अपंग पाहुण्यांचे जागेवर जाऊन आभार मानले असा आगळा वेगळा विवाह सोहळा झाला.
आपली संस्कृती जपली पाहिजे असे नेहमीच म्हटले जाते . कुळांचा उद्धार करणारे वासुदेव लुप्त होत आहे . हे लक्षात घेऊन वासुदेवाच्या आगमनाने विवाह सोहळा सुरू झाला . त्यात वासुदेवाने दान रूपाने मिळालेली चोकलेट्स सुपात फिरवली व नंतर मुलांच्या दिशेने भिरकावली. यावेळी वासुदेव जगाला पाहिजे असा संदेश देण्यात आला .
तसेच या विवाहसोहळ्यास अंध वसतिगृहाच्या विध्यार्थीनी आमंत्रित केल्या होत्या . त्यांनी मोठ्या आनंदाने लग्नात सहभाग घेतला . सुरू असलेला विवाह सोहळा जाणून घेतला . लग्न लागल्यावर त्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले . आम्हाला कुणी बोलवत नाही आज मात्र मोठ्या लग्नात येण्याची संधी मिळाली . आम्हाला खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.