अहमदनगर
पैठण नगरीमध्ये यंदा नाथषष्ठी मोहोत्सव साजरा होणार!

नाथ प्रतिष्ठान व डॉ. क्षितिज घुले युवा विचारमंचाच्या वतीने भाविकांना चहापान व्यवस्था
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
दाक्षिण काशी म्हणुन समजल्या जाणाऱ्या पैठण नगरीमध्ये यंदा श्री संत एकनाथ महाराज नाथषष्ठी मोहोत्सव कोरोना माहामारी नंतर पाहिल्यादांच मोठया उत्साहात संपन्न होणार आहे यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
नाशिक, पुणे सह इतर जिल्हयातील आनेक छोट्या मोठया दिंडया अहमदनगर जिल्हयातील वेगवेगळ्या मार्गानी पैठणकडे प्रस्थान करित आहेत. उन्हाची तमा न बाळगता हातात वारकरी संप्रादायाची पताका घेऊन, टाळ मुदुंगच्या निनादात
सजवलेले वेगवेगळ्या संस्थानचे रथ घेऊन भाविक मोठ्या उत्साहात हरिनामाचा गजर करत पैठण नगरीजवळ करित आहे. ठिक ठिकाणी दिंड्याचे पुजन करून स्वागत होत आहे. त्यातच शेवगाव- नेवासा राजमार्गावरील भायगाव येथे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील प्रेरित नाथ प्रतिष्ठान व डॉ. क्षितिज घुले पाटील युवा विचारमंचाच्या वतीने भायगाव येथे दिंडीतील भाविकांना चहापान व अल्पोहाराची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. भायगाव सह परिसरातील भाविकांच्या वतीने वैयक्तीक स्नेहभोजनाची व्यवस्था माजी सरपंच अशोक दुकळे, युवा नेते विठ्ठल आढाव, रमेश दुकळे, हरिचंद्र चव्हाण, पांडुरंग दुकळे, शिवाजी लांडे, संतोष आढाव, सदाशिव शेकडे, कडुबाळ दुकळे, डॉ. नारायण दुकळे, नारायण आढाव, डॉ. महेश दुकळे, गंगाराम पवार, नानासाहेब दुकळे, बाळासाहेब दुकळे, एकनाथ दुकळे, राजेंद्र दुकळे, प्रा.पांडुरंग दुकळे, पंढरीनाथ लांडे, घनश्याम पालवे, भाजपाचे अशोक देशपांडे, विठोबा दुकळे, भिमाजी भापकर, अमोल देशपांडे, बापुराव दुकळे, कानिफनाथ घाडगे, काकासाहेब विखे, संजय लोखंडे, कडुबाळ सौदागर, सुखदेव शिंदे, सुनिल शेकडे, दत्तात्रय दुकळे, पांडुरंग नेव्हल, आप्पासाहेब दुकळे यांनी केली होती. स्नेहभोजन व चहापानानंतर पैठणच्या दिशेने मार्गस्थ होत आहे .
–
मोठया उत्साहात ठिकठिकाणी संतपुजन
भायगाव येथील नाथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अॅड सागर चव्हाण, डॉ.क्षितिज घुले युवा विचारमंचाचे अध्यक्ष विठ्ठल रमेश आढाव, प्रगतशिल शेतकरी शेषेराव दुकळे, आण्णासाहेब दुकळे, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक भगवान आढाव, भायगावचे सरपंच हरिभाऊ दुकळे, माजी सरपंच सर्जेराव दुकळे माजी चेअरमन गणपत आढाव, दगडू दुकळे, सदाशिव शेकडे, राष्ट्रवादीचे सुरज देशपांडे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष शहाराम आगळे यांच्या वतीने संतपुजन करण्यात आले.