पालकांनी आपल्या पाल्यांसाठी आदर्श बनायला हवे.डाॅ. किरणजी लहामटे

कोतुळ प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे, श्री रामदास हायस्कूल बेलापुर ता अकोले येथे कर्मवीर पद्मभुषण डाॅ. भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कार्यक्रम पार पडला
. आयुष्यात चांगला माणूस बना. भारत महासत्ता होण्यासाठी जिद्द , चिकाटी महत्वाची आहे. पालकांनी आपल्या पाल्यांसाठी आदर्श बनायला हवे. बहुजन समाजासाठी समर्पित भावना निर्माण होणे गरजेचे आहे.असे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी यावेळी बोलताना संगीतले
यावेळी कार्यक्रम प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. विद्यालयाचा १००% निकाल लागल्यामुळे विद्यालयातील सर्व सेवकांचा आमदार डाॅ किरण लहामटे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. ईश्वरी रमेश लांडे हिने विद्यार्थी मनोगत व्यक्त केले. तसेच भाऊसाहेब गंभीरे यांनी शिक्षक मनोगत तर भाऊसाहेब भिसे , तुकाराम अंबादास फापाळे यांनी ग्रामस्थ मनोगत व्यक्त केले.
कर्मवीर जयंती निमित्ताने विद्यालयात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात रांगोळी स्पर्धा विशेष आकर्षण ठरले .तसेच प्रभात फेरी मध्ये टिपरी नृत्य ,लेझीम पथक,झांज पथक ,वारकरी पथक,वाद्य वृंद तसेच थोर स्वातंत्र्य सैनिक वेशभुषा ,पारंपारिक वेशभुषा आदींचा समावेश होता. सामाजिक कार्यकर्ते श्रीपाद (बापू) विष्णूपंत कुलकर्णी यांचे वतीने फळांचे वाटप करण्यात आले.प्रसिद्ध उद्योजक अमित भाऊसाहेब भिसे यांचे वतीने मिष्टान्न भोजन देण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी रभाजी फापाळे,राजाराम फापाळे,गिताराम फापाळे, विठठल महाले,जाचकवाडी सरपंच योगेश महाले, लहुशेठ काळे ,डॉ रावसाहेब महाले , डॉ योगेश फापाळे, राहुल लांडे , डॉ सुधीर काळे, श्रीपाद (बापू) कुलकर्णी, अंकुश त्रिभुवन ,अशोक त्रिभुवन भाऊसाहेब भिसे,भास्कर भिसे, सतीश गाजरे ,दत्ता गवांदे, तात्याराव फापाळे, शिवाजी फापाळे,प्रविण महाले, स्वामी काळे, रवी जगताप, अतुलशेठ आहेर गौरवशेठ आहेर ,काजल काळे, कल्पनाताई फापाळे, गंगुमामी, अंजनाताई खेबडे, रेखा भिसे, आशाताई फापाळे,सुरेखाा फापाळे, डॉ ॠतुजा थोरात , विठ्ठल ढुमणे , शुभांगी कर्डिले, निर्मला शिंदे, गोंदके उमाजी,संजय उकिरडे, संपत बगाड, प्रमोद आरोटे, उदय भारती, निवृत्ती धिंदळे, मीनाताई मांडे आदी ग्रामस्थ आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रमोद आरोटे व शुभांगी कर्डिले यांनी केले. प्रास्ताविक आदरणीय मुख्याध्यापक श्री काशिनाथ तळपाडे यांनी तर आभार संपत बगाड यांनी मानले.