सौ.सुनिताताई भांगरे महिला आयकॉन पुरस्काराने सन्मानित

अकोले प्रतिनिधी-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या तथा जि. प.सदस्या सौ.सुनिता ताई भांगरे यांना आज अहमदनगर येथे लोकमत महिला आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळा अहमदनगर येथील नंदनवन लॉन्स येथे भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.चित्रा ताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,पतसंस्था फेडरेशनचे राज्याध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काकासाहेब कोयटे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे,लोकमत जिल्हा आवृत्तीचे संपादक सुधीर लंके,सर व्यवस्थापक नरेंद्र अंकुश ,जि. प.चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे,बंगडीवाला उद्योग समूहाच्या संचालिका श्रद्धा बिहाणी,रेणुकामाता मल्टिस्टेट चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भालेरावयांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अकोलेतुन विजू आवारी,विकास बंगाळ,अभिजित वाकचौरे, भागवत शेटे हे उपस्थित होते.

सामान्य कुटुंबातील महिला लाजरी बुजरी न राहता सबला व्हावी,आर्थिक दृष्टया सक्षम व्हावी आणि अर्थकारणाच्या मुख्य प्रवाहात तिचा सहभाग असावा म्हणून झपाटलेल्या पावलांनी आदिवासी भागासह आढळा,प्रवरा व मुळा खोऱ्यात बचत गटांच्या माध्यमातून सौ.सूनीता ताई भांगरे यांनी उल्लेखनीय काम हाती घेतले. महिला सबलीकरणासाठी बचत गटांचे मोठे जाळे विणले.जवळपास 370 महिला बचत गटाची स्थापना केली.आणि त्यांना रोजगार ही उपलब्ध करून दिला.आता सहा महिन्यांपूर्वी कोरोनाच्या महामारी संकटामुळे विधवा झालेल्या महिलांचे ही बचत गट केले.महिलांची लीडर शिप त्यांच्या कडे चालून आली.अन शाळेतील लीडर शिप करण्याची कला त्यांना भविष्यात कारणी आली. तीन पिढ्यांचा राजकीय वारसा लाभलेल्या घरात सून म्हणून आल्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक लढविली.राजूर गटातून निवडूनही आल्या.तसेच कोरोनाच्या काळात महिलांना आधार देण्यासाठी त्यांच्या समवेत भाऊबीज साजरी करून नवा आदर्श उभा केला.महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.महिलांच्या सबलीकरणासाठी केलेले काम आणि आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविण्याचा वसा सक्षमपणे त्यांनी पेलला .
म्हणून लोकमत ने त्यांचा लोकमत महिला आयकॉन पुरस्काराने सन्मानित केले.त्यांना हा सन्मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अकोले तालुक्यातून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
