अकोले तालुका पत्रकार संघाचा सन्मान स्फुर्ती व प्रेरणा देणारा- नरेंद्र साबळे

माणुसकीचा कायदा लोकांचा विश्वास संपादन करतो -नितीन खैरनार
अकोले / प्रतिनिधी
अकोले तालुका पत्रकार संघाकडून झालेला सन्मान हा पुढील कामाला ऊर्जा आणि प्रेरणा देणारा असल्याचे मत राजूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नरेंद्र साबळे यांनी व्यक्त केले
अहमदनगर जिल्ह्यातील राजूर पोलिस स्टेशनचा राज्यात पाचवा क्रमांकचे उत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून राज्याच्या गृह विभागाने उत्कृष्ट पोलीस स्टेशन असा गौरव नुकताच केला यानिमित्ताने राजूर पोलीस स्टेशनच्या कामाचे कौतुक करण्यासाठी अकोले तालुका पत्रकार संघाने राजूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नरेंद्र साबळे, एपीआय नितीन खैरनार यांचा राजूर येथील शासकीय शासकीय विश्रामगृह येथे सत्कार आयोजित होता यावेळी ते बोलत होते
यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री नरेंद्र साबळे म्हणाले की प्रशासनात पोलीस खात्यात काम करताना अनेक बरे वाईट अनुभव येतात मात्र आपण कामाशी प्रामाणिक राहिल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येतो यातून पोलीस खात्याची प्रतिमा उंचावता येते कुठलेही काम टीम वर्क शिवाय होत नाही राजूर पोलिस स्टेशनचा राज्यातील पाचव्या क्रमांकाचा पोलीस स्टेशन म्हणून जो सन्मान झाला तो तत्कालीन पोलीस अधिकारी नितीन पाटील व माझे सर्व सहकाऱ्यांचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी त्यांनी गुन्ह्यांचा तपास व उकल करत असताना आलेले वेगवेगळे अनुभव त्यांनी सांगितले
माणुसकीच्या कायद्याने केलेले काम अधिक सुकर होते यातून कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होते आणि लोकांचा विश्वास संपादन करता येतो असे यावेळी एपीआय नितीन खैरनार यांनी सांगितले श्री खैरनार यांच्या पदोन्नती बद्दल पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला
याप्रसंगी पत्रकार संघाचे विश्वस्त एस टी येलमामे, शांताराम काळे, सुनील गीते, श्रीनिवास रेणुकादास, यांनी राजूर पोलीस स्टेशनच्या उत्कृष्ट कामाचे कौतुक करत राजूर पोलिस स्टेशनचा राज्यात पाचव्या क्रमांकावर झालेला गौरव हा जिल्ह्याला व तालुक्याला भूषणावह व अभिमानास्पद असल्याचा सांगितले संघाचे अध्यक्ष सुनील गीते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर सचिव प्रवीण धुमाळ यांनी आभार मानले
याप्रसंगी पत्रकार संघाचे पदाधिकारी राजेंद्र जाधव, विलास तुपे विनायक घाटकर,संजय महानोर ,नितीन शहा ,बाबासाहेब मुंडलिक, अण्णासाहेब चौधरी संजय फुलसुंदर, भगवान पवार ललित मुर्तडक , युवराज हंगेकर,आकाश देशमुख नंदलाल शिंदे अशोक गाडे आदी उपस्थित होते
