श्रीवर्धन – पनवेल बससेवा उद्या पासून होणार सुरू

गवळी समाज संघटनेच्या प्रयत्नांना यश
संदीप लाड
श्रीवर्धन– यादव गवळी समाज संघटना नवी मुंबई – पनवेल यांच्या माध्यमातून 23 सप्टेंबर रोजी संघटनेचे अध्यक्ष गणेश साबळे व सहकारी यांनी श्रीवर्धन येथे आगार प्रमुख महबूब मनेर यांची भेट घेऊन ग्रामीण भागातून कामानिमित्त नवी मुंबई येथे होत स्थलांतर, दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन श्रीवर्धन ते पनवेल आणि पुन्हा पनवेल ते श्रीवर्धन अशी एसटी ची बस सेवा सुरू व्हावी यासाठी मागणी केली त्यानुसार सदरची सेवा 1 ऑक्टोबर पासून शिवशाही बस सुरू करण्याचे आश्वासन आगारप्रमुख महेबुब मनेर यांनी दिले
यावेळी श्रीवर्धन आगार प्रमुख मेहबूब मनेर यांची भेट घेताना पनवेल गवळी समाज संघटनेचे प्रमुख पदाधिकारी गणेश साबळे,नरेश काते , अनिल काते,सुनील लटके,जेष्ठ समाजसेव सुहास महागावकर,नामदेव साबळे,मोहन लाड,रुपेश महाडिक,संतोष मिरगळ प्रमोद साबळे उपस्थित होते
