लग्न घरी दागिन्यांची चोरी करणारा आरोपी राजूर पोलिसांनी गजाआड केला

विलास तुपे
राजूर / प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील वारंघुशी येथे 30,000/रु. किमतीच्या दागीन्यांची चोरी करणाऱ्या गुन्हेगारास राजुर पोलीसानी मुद्देमालासह केले जेरबंद.
दि.28/032022 रोजी फिर्यादी खंडु सखाराम घाणे, वय 50 वर्षे,धंदा-मजुरी, रा.वारंघुशी, ता.अकोले जि.अहमदनगर. यांचे घरी लग्न समारंभ असल्याने बरेच पाहुने आले होते. सकाळी 08.30 वा. चे सुमारास फिर्यादीची चुलती लुलबाबाई नामदेव घाणे ही त्यांचे घरी आंघोळीसाठी आली होती. तीने तिचे अंगावरील दागीने चांदीचे धातुचे बाजुबंदाचा एक जोड खंडु सखाराम घाणे यांचे घराचे खिडकीत ठेवलेले होते. अंघोळ झाल्यानंतर सदरचे चांदीचे धातुचे बाजुबंदाचा एक जोड मिळुन आला नाही. सदरचे दागीने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले आहे. बाबत खंडु सखाराम घाणे यांनी तक्रार दिल्याने राजुर पोलीस स्टेशला गु.र.नं. 57/2022 भा.द.वी. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा सपोनि/नरेद्र साबळे, व पोलीस कर्मचारी तपास करत असताना गोपणीय माहिती काढुन सदरचा गुन्ह्याबाबत मारुती रामा कातडे, रा. वारंघुशी, ता. अकोले यास ताब्यात घेवुन सदर चांदीचे धातुचे बाजुबंदाचा एक जोड बाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करुन त्याचेकडुन चोरीस गेलेला खालील प्रमाणे संपुर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
1) 30,000/-रु. किमतीचा चांदीचे धातुचे बाजुबंदाचा एक जोड कि.जु.वा.अं.
सदरची कारवाई श्री.मनोज पाटील . पोलीस अधिक्षक अहमदनगर, .श्रीमती स्वाती भोर , अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर व.श्री.राहुल मदने उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राजुर पोलीस स्टेशनचे अधिकारी सपोनि नरेंद्र साबळे व अंमलदार- पो ना दिलीप डगळे, पोकॉअशोक काळे यांनी केली आहे.