राजापूर महाविद्यालयात ऑनलाइन कार्यशाळा पार पडली.

अकोले प्रतिनिधी
प्रागतिक शिक्षण संस्थेचे नुतन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजापूर, तालुका – संगमनेर, जिल्हा- अहमदनगर. येथे दिनांक 06 एप्रिल, 2022 रोजी एक दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा ” Applications Of Mathematics In Daily Life” या विषयावर पार पडली. या कार्यशाळेसाठी अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन ‘संगमनेर नगरपालिका आर्टस्, डी.जे मालपाणी कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय, संगमनेर’ येथील ‘गणित तसेच संख्याशास्त्र’ विभाग प्रमुख प्राध्यापक सुरेश गुडदे सर यांनी केले. या कार्यशाळेची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कडलग सर यांनी प्रास्ताविक करून केली. कार्यशाळेचे आयोजन गणित विभाग प्रमुख प्राध्यापक भवर संगीता चांगदेव, IQAC Co – Ordinator डॉ. संगीता जांगिड मॅडम, Sub – Co- Ordinator प्राध्यापिका सविता हासे मॅडम, प्राध्यापक सुभाष वर्पे सर यांनी केले. विज्ञान विभागातील तसेच कला व वाणिज्य विभागातील शिक्षकांनी देखील सक्रिय सहभाग घेतला. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्राध्यापिका भवर संगीता मॅडम यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका देशमुख शीतल यांनी केले.