सारथी कडून सारर्थ्यांच्या यशस्वी संघर्षाचा सन्मान

.
गणोरे प्रतिनिधी :- (सुशांत आरोटे)
सारथी परिवार नेहमीच सारथीच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी झटत आला आहे ,त्यांच्या सुख दुःखात नक्कीच उभा राहिलेला आहे. सारथी परिवारातील विविध परीक्षांत यशस्वी झालेल्या मान्यवरांचे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यात प्रामुख्याने मा.विशाल लोखंडे ( MARKATING OFFICER SCALE-I) युनियन बँक ,मा.प्रतीक्षा दातीर (ASSSTANT IBPS) बँक ऑफ इंडिया ,मा.शंतनु खुळे (IBPS PO ) बँक ऑफ महाराष्ट्र यांनी अभूतपूर्व यश संपादन केले आहे .त्यांच्या याच यशाचा गौरव करण्यासाठी एक छोटासा कार्यक्रम सारथीच्या वतीने आयोजित केला.., यात सर्व यशस्वीतांना शाल व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमात यशस्वी मान्यवरांचे अनुभव ,संघर्ष आणि यश यांचा प्रवास त्यांनी व्यक्त केला
” यश हे त्याच्या गरजेवर आणि ते किती प्रतिकुल परिस्थितून माणूस मिळवतो यावर त्याची किंमत ठरत असते ” -शंतनु खुळे.
” यशासाठी निर्णायक कष्ट ,सातत्य आणि मूलभूत अभ्यासाची गरज असते ” असे प्रतिपादन मा.विशाल लोखंडे यांनी केले.
संघर्षातून विजयाची गाथा निर्माण करता येऊ शकते अश्या पद्धतीची वाटचाल मा. प्रतीक्षा दातीर यांनी मांडली.
खरतर यश, अपयश ह्या काही वेगळ्या गोष्टी नाहीतच त्या आपण जश्या पाहू तश्या आहेत ; अपयशात यश पाहता आलं म्हणजे त्यांचं एक स्वरूप लक्षात येत.
कार्यक्रमाचे नियोजन सारथी फाऊंडेशन चे सचिव मा.अजय संपत हांडे ,प्रकल्प प्रमुख मा.ऋषिकेश घोडेकर,प्रकल्प प्रमुख मा.मंगेश वाघमारे यांनी सारथीचे अध्यक्ष मा.अक्षय बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली केले.कार्यक्रमात बोलत असताना मा.अजय हांडे यांनी ” सर्वांच्या यशात आनंदाने सहभागी होत स्वतःच्या अपयशाचे पाढे गिरवत आपल्याला पुन्हा लढण्यासाठी सज्ज होता आलं पाहिजे.” असे प्रतिपादन केले तसेच मा.ऋषिकेश घोडेकर व मा.मंगेश वाघमारे यांनी सर्व यशस्वी मान्यवरांचे कौतुक केले,त्यांच्या संघर्षाला सलाम केला.यावेळी सारथी परिवातून मा.अपेक्षा आहेर, मा.मयुरी आंबरे तसेच मा.ओंकार थोरात यावेळी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे छायांकन मा.वैभव ढोले यांनी केले.