राजेगाव च्या रस्त्यांसाठी नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपुल येथे रास्तारोको आंदोलन

राजेगाव ग्रामस्थ रस्त्यासाठी रस्त्यावर
विजय खंडागळे
सोनई : तालुक्यातील राजेगावला जोडणारे सर्वच रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करा या मागण्यांसाठी रविवार दि. २८ रोजी राजेगाव ग्रामस्थांनी नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपुल येथे रास्तारोको आंदोलन केले. दरम्यान, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे उपअभियंता यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
रास्तारोको आंदोलन दरम्यान, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी, नेवाशाचे नायब तहसीलदार व सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी आंदोलकांची भेट घेत चर्चा करून निवेदन स्वीकारले. त्यावेळी सदर राजेगाव रस्त्याचा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आराखड्यात सामावेश केला आहे. मात्र, वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. असे आश्वासन उपअभियंता यांनी दिल्याने आंदोलन थांबले. मात्र, येत्या चार जूनपर्यंत राजेगावचा रस्ताप्रश्न निकाली न लागल्यास राजेगाव ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला. या आंदोलनात शिंगवे तुकाई, मांडे मोरगव्हाण, वांजोळी, शिंगवे केशव, पांगरमल ग्रामस्थ सहभागी झाले होते. रास्तारोको
रास्तारोको आंदोलनात राजेगावचे सरपंच अंबादास आव्हाड, उपसरपंच पांडुरंग आव्हाड, तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग शिरसाठ,, पांगलमलचे सरपंच अमोल आव्हाड, बापू आव्हाड, ज्ञानेश्वर आव्हाड, खोसपुरी माजी सरपंच सोमनाथ हरेर, शिंगवे तुकाईचे सरपंच, केशव शिंगवेचे अशोक घोरपडे, वांजोळी सोसायटीचे चेअरमन बद्रीशेठ खंडागळे, तुकाराम आव्हाड, उद्धव शिरसाठ, सचिन आव्हाड, रामनाथ आव्हाड, संतोष मांडवकर, संजय ठोकळ, मोहन गर्जे, भास्कर कोरके, किशोर आव्हाड, संतोष आव्हाड, योगेश आव्हाड यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. महिला व विद्यार्थी आंदोलकांचा सहभागही लक्षणीय होता.
अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या उपअभियंत्याने दिलेल्या आश्वासनानंतर राजेगाव ग्रामस्थांनी आपला रस्तारोको आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र येत्या चार जूनपर्यंत राजेगावचा रस्ताप्रश्न निकाली न लागल्यास शासनास कोणताही पूर्व कल्पना न देता राजेगाव ग्रामस्थांच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘बँड पथक’ मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी सरपंच अंबादास आव्हाड, उपसरपंच पांडुरंग आव्हाड यांनी यावेळी दिला आहे.