स्त्रीचा सन्मान करणारी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती . प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे

दत्ता ठुबे
पारनेर – स्त्रीचा सन्मान करणारी संस्कृती म्हणजे आपली भारतीय संस्कृती , असे अभिमानास्पद गौरवोद्गार श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . गुंफा कोकाटे यांनी काढले .
निघोज येथील श्री मुलिकादेवी महाविदयालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि बहिशाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बॅरिस्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेत बोलताना प्राचार्य डॉ . गुंफा कोकाटे पुढे म्हणाल्या की , आयुष्य जगत असताना व स्पर्धा परीक्षेच्या युगात वावरत असताना , तुम्ही कोणतीही पद मिळवा , मोठे साहेब व्हा , पण आई-वडिलांना सन्मान वाटेल , असे कार्य करा. परिस्थितीची जाणीव ठेवली , तर माणूस खूप पुढे जातो. संत महात्म्यांनी खूप त्याग केला. स्वतःला अभ्यासात, समाज सुधारणेत झोकून दिले. सन्मान मिळविले. आपणही करू शकतो. मानवता, समता या पलीकडे जाऊन सक्षमीकरणाच्या पायऱ्या चढू शकतो. आपण सर्वांनीच लैंगिक चौकटीतून बाहेर पडून समानतेने उभे राहिले पाहिजे. आज अवतीभवती खूप घटना घडत आहे. स्त्रियांवरील अत्याचार वाढत आहे. ज्ञान विज्ञानाच्या या क्षेत्रामध्ये मनोरंजन व वासनाधीनता वाढत चालली आहे. तुमचं आमचं एक नातं व एक रक्त आहे. मग आपला समाज जागे कधी होणार , असा सवालही त्यांनी आपल्या व्याख्यानात केला
. मुलगा काय , मुलगी काय वंशाचा दिवा एकच आहे. वाढत्या स्त्रियांवरील अत्याचार, स्त्री भृण हत्या व अनेक कारणांमुळे आज स्री – पुरुष प्रमाण कमी अधिक झाले आहे. खरे तर ही खूप चिंतेची बाब आहे. आपला तरुण व्यसन, राजकीय दंगली, हिंसाचार फिल्मी जगाचे आकर्षण, मोबाईलचा अतिवापर, धावपळीचा आहारामुळे आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. अशा विळख्यात अडकला आहे. या बाह्य आकर्षणाचे अनुकरण करत आहे. तरुणांनी अशा गोष्टींपासून सावध राहायला हवे. भारतीय संस्कृती प्रमाणे आपले आचरण असल्यास जीवन जगताना आपल्याला अडचणी कमी येतात. माणसाला माणूस म्हणून सन्मान देण्यासाठी संत महात्म्यांनी खूप परिश्रम घेतले. आपणही इतरांना समान संधी, समान सत्ता, समान स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. आपल्या गावासाठी, आपल्या माणसांसाठी, आपल्या मातीसाठी काम केले पाहिजे, झटले पाहिजे. यातच सर्वांचे हित आहे. असे मत त्यांनी शेवटी व्यक्त केले.
प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी ‘जिंकत गेले आयुष्य’ हे पुस्तक महाविद्यालयास भेट दिले.
अध्यक्षीय मार्गदर्शनामधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी मुलींना शिक्षणासाठी प्रेरणा दिली पाहिजे. मुली शिकल्या तर देशाचा विकास होईल. मुलगी ही दोन गाव , दोन राज्य , दोन देश जोडण्याचे महत्वपूर्ण काम करते. महिलांमध्ये कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी क्षमता असते, जिद्द चिकाटी यांच्या बळावर महिला आज विविध पदावर, देशपातळीवर खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. ज्या दिवशी आपण स्त्रीचा सन्मान करायला शिकलो. त्यादिवशी समजावे की , आपण जे शिकलो. गुरुजन आई-वडिलांकडून जी दिशा मिळाली. माणूस म्हणून आपण सिद्ध झालो. असे ही प्राचार्य आहेर यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. चित्रा घोडे यांनी पोलीस उपनिरीक्षक पद मिळवल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील डॉ. पोपट पठारे यांनी एन सी सी चे ट्रेनिंग नागपूर येथील कामठीपूर या ठिकाणी पूर्ण करून लेफ्टनंट ही पदवी मिळवली , त्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नगर जिल्हा सचिव पदी ज्येष्ठ पत्रकार व दैनिक जनप्रवास चे पारनेर ग्रामीण चे प्रतिनिधी सुरेश खोसे पाटील यांची निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ . सहदेव आहेर व प्राचार्या डॉ . गुंफा कोकाटे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. सर्व मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, समन्वयक प्रा. संगीता मांडगे यांनी केले. सुंदर व नेट नेटके सूत्रसंचालन प्रा. नूतन गायकवाड यांनी केले , तर आभार प्रा. मनीषा गाडीलकर यांनी मानले.
या प्रसंगी डॉ. मनोहर एरंडे, डॉ. प्रवीण जाधव, प्रा. स्वाती मोरे, डॉ. दुर्गा रायकर, प्रा. अशोक कवडे, प्रा. सचिन निघुट, प्रा. अक्षय अडसूळ , प्रा. आनंद पाटेकर, प्रा. निलिमा घुले, प्रा. आश्विनी सुपेकर, प्रा. नम्रता थोरात, प्रा. अपेक्षा लामखडे, प्रा. अमृता दौंडकर, प्रा. वृषाली जगदाळे, प्रा. निकिता सुरोशे, प्रा. रूपाली गोरडे, प्रा. पुनम गंधाक्ते, प्रा. स्वाती पवार, प्रा. हर्षदा पंडित, प्रा. सुनंदा गाडीलकर, प्रा. सुप्रिया सालके, डॉ. गोरक्ष घोलप, प्रा. दीपक खामकर, प्रा. सुरेश गाडीलकर, प्रा. प्रवीण सरडे, श्री. नवनाथ घोगरे, संदीप लंके ,अक्षय घेमुड, किशोर बाबर , प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
