आजचे पंचांग व राशिभविष्य दि १०/०४/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁 आजचे पंचांग 🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र २० शके १९४४
दिनांक :- १०/०४/२०२२,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४४,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- नवमी समाप्ति २७:१६,
नक्षत्र :- पुष्य अहोरात्र,
योग :- सुकर्मा समाप्ति १२:०३,
करण :- बालव समाप्ति १४:२४,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- मीन – रेवती,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०५:१० ते ०६:४४ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२४ ते १०:५७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५७ ते १२:३१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:०४ ते ०३:३७ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
श्रीराम नवमी, देवीला दवणा वाहणे, देवी नवरात्र समाप्ति,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र २० शके १९४४
दिनांक = १०/०४/२०२२
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबात तुमचा दबदबा वाढेल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. गुंतवणुकीचा नवीन मार्ग शोधाल.
वृषभ
करमणुकीत जास्त वेळ घालवाल. जोडीदाराचे भरभरून कौतुक कराल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. आवक जावक यांचा मेळ घालाल.
मिथुन
क्षणिक सुखाने खूश व्हाल. कामाचा वेग वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.
कर्क
आवडीच्या कामांवर भर द्याल. सरकारी कामे मार्गी लागतील. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. कौटुंबिक सौख्याचा प्रथम विचार करावा. मनातील सुप्त इच्छा पूर्ण कराल.
सिंह
मानसिक चंचलता जाणवेल. भावनेच्या आहारी जाऊ नका. अंगीभूत कला सर्वांसमोर सादर कराल. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. उगाच काळजी करत बसू नये.
कन्या
मुलांचे विचार दुराग्रही वाटू शकतात. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. धार्मिक कामात सहभाग घ्याल. कल्पना शक्तीला चांगला वाव मिळेल. विशाल दृष्टिकोन ठेवाल.
तूळ
अचानक धनलाभ संभवतो. कामात गतीमानता लाभेल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. घाई -घाईने कामे उरकू नका. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे.
वृश्चिक
पत्नीचा लाडीक हट्ट पुरवाल. कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल.
धनू
अनाठायी खर्च वाढू शकतो. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. पत्नीचा प्रेमळ सहवास लाभेल. महिलांना गृहिणी पदाचा मान मिळेल. योग्य संधीसाठी थोडा वेळ द्या.
मकर
श्रम व दगदग वाढू शकते. पित्त विकार बळावू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका. जवळचे मित्र भेटतील. प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल.
कुंभ
कामाचे समाधान लाभेल नातेवाईकांचे सहकार्य घेता येईल सहकाऱ्यांची योग्य वेळी मदत होईल आत्मविश्वास बाळगावा लागेल. उगाच चीड-चीड करू नये.
मीन
स्वछंदीपणे विचार कराल. कामातील सर्व बाजू व्यवस्थितपणे समजून घ्याल. मानसिक व्यग्रता जाणवेल. जुगाराची आवड पूर्ण करता येईल. मुलांबरोबर खेळात रमून जाल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर