इतर

सिद्धेश काळेची क्रीडा क्षेत्रात गगनभरारी. थाळीफेक क्रीडा प्रकारात राज्यात तृतीय क्रमांक.

अकोले प्रतिनीधी


अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेले खिरविरे येथील सिद्धेश राजू काळे याने क्रीडा क्षेत्रात गगन भरारी घेत थाळीफेक क्रीडा प्रकारात राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे. सिद्धेश हा संगमनेर येथील एस.एम.बी.एस.टी कॉलेजला शिक्षण घेत असून तो सत्यनिकेतन संस्थेच्या खिरविरे येथील सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचा माजी विद्यार्थी आहे.
महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित,राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे पार पडल्या. या थाळी फेक क्रीडा प्रकारात सिद्धेश राजू काळे याने घवघवीत यश संपादन करत राज्यात तृतीय येण्याचा मान पटकवला आहे.

याआधीही उत्कृष्ट कामगिरीमुळे सिद्धेशला राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त चंदूकाका सराफ ज्वेलर्स यांच्याकडून संगमनेर तालुका उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हात इंजुरी मध्ये असताना सिद्धेशने प्रथम क्रमांक मिळवला म्हणून जिल्हा क्रीडा कमिटीने त्याचे अभिनंदन केले आहे.सिद्धेशचे प्राथमीक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा खिरविरे येथे झाले असून इयत्ता पाचवी ते बारावीचे शिक्षण सत्यनिकेतन संस्थेचे सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरे येथे झाले आहे.पुस्तकी ज्ञानाबरोबरच पहाटे लवकर उठून विविध खेळांचा सराव,व्यायाम करणे तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन यापेक्षा वेगळे मार्गदर्शन नाही.परंतू ध्येय,चिकाटी,आत्मविश्वास,काहीतरी नवीन शोधण्याची वृत्ती तसेच आई, वडीलांचे संस्कार या जोरावर सिद्धेशने क्रीडा क्षेत्रात मिळविलेले यश खरोखरच वाखान्याजोगे आहे.

या नेत्रदीपक यशाबद्दल सिद्धेशचे खिरविरे पंचक्रोशीसह अकोले,संगमनेर तालुक्यात चांगलेच अभिनंदन होत आहे.याबद्दल संगमनेर एस.एम.बी.एस.टी कॉलेजचे प्राचार्य डॉ.दिनानाथ पाटील,उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब वाघ,क्रीडा शिक्षक प्रमोद खैरे,घाईवड सर,शिंदे सर, गुंजाळ सर, भोर सर,सर्व कॉलेज स्टाप,खिरविरे ग्रामपंचायतीचे सरपंच गणपतराव डगळे,उपसरपंच सुभाषशेठ बेणके, माजी उपसरपंच रामभाऊ बेनके,काशिनाथ बेनके,काळू पुनाजी बेनके, दशरथ कुलाळ,बाळू बेनके,दिनेशशेठ शहा,त्रंबक पराड,निवृत्ती पराड यांसह सर्वोदय विदयालयाचे माजी प्राचार्य अंतुराम सावंत,लहानू पर्बत, प्राचार्य मधूकर मोखरे,क्रीडा शिक्षक संपत धुमाळ,लिपिक भास्कर सदगीर,प्रा.सचिन लगड,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आदिंनी अभिनंदन केले.तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button