अकोले शहरासाठी जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना करा – प्रमोद मंडलिक

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे कडे केली मागणी
अकोले प्रतिनिधी
जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत अकोले
शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना करा अशी मागणी अकोले नगरपंचायत चे
नगरसेवक व शिवसेनेचे अकोले तालुका कार्याध्यक्ष प्रमोद मंडलिक यांनी केली आहे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना गुलाबराव पाटील यांची मंत्रालयात भेट घेत त्यानी ही मागणी केली
अकोले ३२ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना Retrofitting अंतर्गत प्रस्तावित
‘असून सदर योजनेसाठी ५५ लि. / दरडोई दर दिवशी हा निकष निश्चित केलेला आहे.
मुळ अकोले व ३२ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम ४० लि. / दरडोई दर दिवशी
निकषाप्रमाणे करण्यात आलेले असून सदर योजनेत अकोले गावचा समावेश अकोले ग्रामपंचायत अस्तित्वात असतांना म्हणजेच २०१५ पुर्वी केला होता. उपरोक्त प्रमाणे जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गतच्या Retrofitting योजनेमध्ये अकोले शहराचा समावेश करावयाचा झाल्यास अकोले शहरासाठी ५५ लि. ते १४० लि. दरडोई निश्चित असल्याने तसेच अकोले शहराची वाढती लोकसंख्या निकषाप्रमाणे पाणी पुरवठा योजना तयार करावी लागेल. अकोले नगरपंचायत
शहराची वाढती लोकसंख्या २५,०००/- असल्याने अकोले शहरासाठी लवकरात लवकर नवीन पाणी पुरवठा योजना करणे योग्य राहील.
अकोले नगरपंचायत शहराचा जल
जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत अकोले शहराचा समावेश व त्याअंतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना करावी अशी मागणी श्री प्रमोद मंडलिक यांनी पाणी पुरवठा मंत्री ना गुलाबराव पाटील यांचे कडे केली आहे