मामा भाचे बैलजोडीचे शनिशिंगणापूरात केले भव्य स्वागत !

विजय खंडागळे
सोनई-प्रतिनिधि
-पुरातन काळापासून चालत आलेल्या शनिदेवाला पहिल्या दर्शनाचा लाभ म्हणून मामा भाचे याला स्थान दिल्याची आख्यायिका आहे,त्यात मनुष्य जातीमध्ये पाहिले आहे, परंतु कित्येक वर्षांपासून ही मामा भाचे ची लहानपणापासून संगोपन केलेली बैलजोडी शनिशिंगणापूर येताच शिवसेनेचे शहर प्रमुख काळू हाटकर यांनी गावातून भव्य मिरवणूक काढून भव्य स्वागत केले. त्यानंतर पूजा,धार्मिक विधी करून शनिदर्शन घेतले.अनोखी महती असलेल्या या बैल जोडीची भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती
,नगर तालुक्यातील कापूरवाडी येथील अशोक ज्ञानदेव लोणारे व त्यांच्या पत्नी लता अशोक लोणारे यांनी १९ वर्षांपूर्वी एक संकल्प करून शनिदेवाचे मामा भाचे म्हणून आपली बैलजोडी आणून शनिदर्शन घडावे यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी दाखल होताच मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली परंपरा राखून शिवसेनेचे शहरप्रमुख काळू हाटकर यांनी स्वागत करून गावातून मिरवणूक काढली,भाविक भक्तांनी हा आगळा वेगळा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी रेलचेल होत होती,त्याच्या समवेत ज्ञानदेव भगत,संदीप दुसुंगे, शिवाजी लोणारे,कानीफ मगर,गोटीराम फुलमाळी, अजित मुकादम,बापू देठे,हे होते.सर्वांचा सन्मान अध्यक्ष भागवत बानकर ,व शिवसेना शहर प्रमुख काळू हाटकर यांनी केला.
*अनेक वर्षे परंपरा कायम आहे, परंतु शनिदेवाला मामा भाचेचे महत्त्व आहे, ही बैलजोडी दर्शन कौतुकास्पद असून प्रेरणादायी आहे.-
–अध्यक्ष भागवत बानकर
,शनिशिंगणापूर*