इतर

दत्त जयंती निमित्त नेप्तीत विविध कार्यक्रम.


अहमदनगर – नगर तालुक्यातील नेप्ती येथील चौरे मळ्यातील दत्त मंदिर येथे दत्त जयंती निमित्त चौरे परिवार , दत्त सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्यावतीने पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती रामदास फुले यांनी दिली .


शनिवार दि .१४ डिसेंबरला पहाटे ४ वा. काकडा भजन, सकाळी ८वा. विष्णूसहस्रनाम ,सकाळी १० वा. गाथा भजन होणार आहे. दत्त जयंतीचे हे ४१ वे वर्षे आहे.

या निमित्ताने मंदिरावर व मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे . सायंकाळी ४ ते ६ या वेळात ह .भ .प.मुकुंदकाका महाराज जाटदेवळे यांचे दत्त जन्माचे कीर्तन होईल .तसेच ६ ते ८ या वेळेत पालखी सोहळ्याचा कार्यक्रम होईल .रात्री ९ ते११ या वेळेत ह .भ.प.दिनकर महाराज आचवले यांचे किर्तन होईल.

रविवार दि. १५डिसेंबरला ह. भ .प.बाळकृष्ण महाराज कांबळे ताराबाद ता. राहुरी यांचे काल्याचे किर्तन सकाळी १० ते १२ या वेळेत होईल व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तरी परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चौरे परिवार व दत्त सेवा मंडळाने केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button