शेतकऱ्यांच्या वीज पंपा वर डल्ला मारणारी टोळी गजाआड!

अकोले पोलीसांची कामगिरी
अकोले प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासुन अकोले तालुक्यात शेतकऱ्यांच्या विहीर व नदीवरील पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटारी चोरी जाण्याचे प्रकार वाढले होते. यामुळे तालुक्यातील शेतकरी हैराण झाले होत दिनांक 04.04.2022 रोजी कळस बु॥ ता अकोले परिसरातुन तक्रारदार यांची 7000/- रुपये किमंतीचा टेक्स्मो कंपनिची पाच हॉर्सपॉवरची इलेक्ट्रीक मोटार चोरी गेलेबाबत अकोले पोलीस स्टेशन तक्रार प्राप्त झाल्यानंतर तक्रारदार यांची तात्काळ तक्रार नोंदवुन घेवुन अकोले पोलीस स्टेशनला गुरनं 136/2022 भा.द.वि कलम 379 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदरचा प्रकार सातत्याने घडत असल्याने वरिष्टांचे सुचना व मार्गदर्शना खाली मालाविरुदधच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होणेकरीता नाकाबंदी, कोंम्बीग ऑपरेश, मालाविरुदध चोरी करणाऱ्या आरोपींचे राहते घरी अचानक भेट अश्या प्रकारच्या कारवाया नियमीत सुरु असताना सपोनि मिथुन घुगे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वर नमुद चोरी गेलेली मोटार ही (1)भाऊसाहेब तुकाराम डोके रा कळस खु॥ ता अकोले (2) संदिप सखाराम पथवे रा कळस बु॥ ता अकोले जि अ.नगर यांनी त्यांचे साथीदांरासह मिळुन सदर इलेक्ट्रीक मोटार चोरी केलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरील दोन्ही इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सदरची चोरी ही त्यांचे साथीदार (3)विकास वसंत वाकचौरे वय 32 वर्षे कळस बु॥ ता अकोले जि अ.नगर (4)निलेश गोरख आगविले रा कळस खु॥ ता अकोले जि अ.नगर यांचे मदतीने चोरी केलेबाबत कबुली दिल्याने वरील चारही इसमांना नमुद गुन्ह्यात अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्यांना अटक केली मा. न्यायालयात हजर केले असता त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्यांचेकडे तपास केला असता त्यांचे कब्जातुन 1) 7,000/- रुपये किमंतीची टेक्सो कंपनिची मोटार 2)4000/- रु किमंतीची इलेक्ट्रीक मोटार 4 हॉर्सपॉवरची असा एकुण 11,000/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा अधिक तपास अकोले पोलीस करीत आहे.
आरोपी नं 1)भाऊसाहेब तुकाराम डोके रा कळस खु॥ ता अकोले जि अ.नगर याचे विरुदध विविध पोलीस स्टेशनला खालील गुन्हे दाखल आहे.
1)संगमनेर शहर पो स्टे गुरनं 136/2016 भा.द.वि कलम 457,380 प्रमाणे.
2) कोपरगाव पो स्टे गुरनं 146/2016 भा.द.वि कलम 379,34 प्रमाणे.
3) संगमनेर तालुका पो स्टे गुरनं 143/2017 भा.द.वि कलम 394 प्रमाणे.
4) घारगाव पो स्टे गुरनं 276/2019 भा.द.वि कलम 379, प्रमाणे.
5) संगमनेर तालुका पो स्टे गुरनं 282/2020 भा.द.वि कलम 379,34 प्रमाणे.
6) अकोले पो स्टे गुरनं 196/2020 भा.द.वि कलम 457,380 प्रमाणे.
आरोपी नं 2 संदिप सखाराम पथवे रा कळस ता अकोले जि अ.नगर याचेविरुदध दाखल गुन्ह्याची माहिती खालील प्रमाणे.
1) ओतुर पो स्टे गुरनं 313/2020 भा.द.वि.कलम 457,380 प्रमाणे
2)आळेफाटा पो स्टे गुरनं 363/2020 भा.द.वि कलम 399,402 प्रमाणे.
सदरची कारवाई म पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील सो व मा. अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मिथुन घुगे, पोउपनिरी भुषण हांडोरे,व अकोले पोलीस स्टेशन नेमणुकीचे सफौ शेख,पोकॉ विजय खुळे, पोकॉ आंनद मैड, पोकॉ सुयोग भारती, पोकॉ अविनाश गोडगे , यांनी केली असुन पुढील तपास सफौ एम आय शेख हे करीत आहे.