गप्प राहण्याच्या वृत्तीने समाजाचे भले होणार नाही– प्रा.रंगनाथ पठारे

संगमनेर प्रतिनिधी
समाजाने गप्प राहणे पसंत करू नये.त्यांच्या या वृत्तीने समाजाने भले होणार नाही.या देशात शाहू,फुले, आंबेडकर यांनी माणसांना बोलण्याची हिम्मत दिली आहे.त्यांच्या विचाराची आज निंतात गरज असल्याचे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते जेष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे यांनी केले .ते सोमनाथ मुटकुळे लिखित खेळ मांडियेला,पुन्हा क्रांतीज्योती व संदीप वाकचौरे लिखित सृजनाची वाट या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.यावेळी शांती फौडेशनच्या वतीने विशेष योगदान देणा-या मान्यवरांना गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सदस्य आ.डॉ.सुधीर तांबे हे होते.यावेळी व्यासपीठावर आ.डॉ.किरण लहामटे,संगमनेर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहळ,मधुकरराव नवले,नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,डॉ.बालाजी जाधव,सनय प्रकाशनाचे शिवाजी शिंदे,रामहरी कातोरे,मिलींद कसबे,शाम शिदे,शशिकांत नजान , सतीश लोटके आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा.पठारे आपल्या भाषणात म्हणाले की,आज विचार पुढे घेऊन जाणा-या लेखक व प्रकाशकांची गरज आहे.तुकोबा,फुले यांचे विचार पुढे घेऊन जाण्याबरोबर त्यांच्या विचाराने राजकारणाची गरज आहे.मुटकुळे यांनी फुल्यांच्या विचाराचे राजकारण करण्याची गरज आहे.वाकचौरे यांनी शिक्षणाबददलचा प्रश्न अत्यंत आस्थेने मांडले आहे.आज शिक्षणात आस्था फारशी उरली नाही.साहित्य हे अजरामर असते. आज आदर्श ठेऊन जगण्याची गरज आहे.समाजाने शिक्षणाबददलचा विचार अधिक गंभीरपणे करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की,वर्तमानात देशात अत्यंत चिंताजनक परीस्थिती आहे.आज प्रतिक्रांती होण्याची गरज निर्माण झाली आहे.त्यासाठी विचाराची मस्तके निर्माण करण्याचे काम केले जात आहे.समाजाला आता हलून जागे करण्याची गरज आहे.समाजाला जागे करण्याचे काम साहित्यातून घडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.यावेळी डॉ.बालाजी जाधव यांनी संत तुकाराम ते महात्मा फुले व्हाया छत्रपती शिवाजी महाराज याविषयावर व्याख्यान झाले.त्यांनी तुकोबांमुळे येथील भूमी अधिक समृध्द झाल्याचे सांगितले.छत्रपती,महात्मा फुले यांच्या विचाराचे पाईक होण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी डॉ.लहामटे,मधुकरराव नवले,शिवाजी शिंदे यांची भाषणे झाली.
पुरस्कारामागील भूमिका निवड समितीच्या अध्यक्षा दूर्गाताई तांबे यानी विषद केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सोमनाथ मुटकुळे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप वाकचौरे यांनी तर आभार सी.के मुटकूळे यांनी मानले.कार्यक्रमास वसंत मनकर,विलास कवडे,विलास वर्पे,परशराम पावसे,उमेश डोंगरे,डी.बी.राठी,राजाभाऊ अवसक यांच्यासह मोठया संख्येने नागरिक उपस्थितीत होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूर्यकांत शिंदे,बाळासाहेब घुले,बाळासाहेब नवले,वसंत बंदावणे,गोरक्ष मदने, संदीप वलवे,विकास भालेराव यांनी प्रयत्न केले.
यांना मिळाले पुरस्कार
शांती फौंडेशनच्या वतीने दोन वर्षाच्या पुरस्कारप्राप्त मान्यवराना गौरविण्यात आले.यात कामगार नेत कॉ.कारभारी उगले,नाटयकर्मी सूर्यकांत शिंदे ,साहित्यिक के.जी.भालेराव यांना तर मरणोत्तर सायन्ना एनगंदूल यांना परिवर्तन पुरस्कार देण्यात आले.जीवन गौरव पुरस्काराने कामगार नेते सुखदेव वर्पे यांना गौरविण्यात आले.नाटयगौरव पुरस्काराने राजन झांबरे,वंदना जोशी,शिवराम बिडवे,संध्या भाटे,प्रा.संगिता परदेशी यांनी तर लिटल चॅंप सारंग भालके,बॉक्सिंग सुवर्णपदक विजेती दिव्या वर्पे,पलाश शिंदे,हर्षदा वर्पे,ऋतुजा मुटकूळे,मुखपृष्ठ तयार करणा-या अनुष्का वाकचौरे,दिपक गोरे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,मानपत्र देऊन गौरविण्यात आले.