इंदोरी च्या अक्षय देशमुख ची सहाय्यक अभियंता (वर्ग २) या पदावर जलसंपदा मध्ये निवड!

–अकोले प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जलसंपदा विभागच्या सहाय्यक अभियंतापदी इंदोरीचे अक्षय सुभाष देशमुख यांची निवड झाली आहे. अक्षय शेतकरी कुटुंबातील असून कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन न घेता स्वयंम अध्ययनाच्या जोरावर त्याने यश मिळवले महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या इंजिनिअरिंग सर्विसेस परीक्षेत कु.अक्षय देशमुख याची सहाय्यक अभियंता (वर्ग २) या पदावर जलसंपदा विभागमध्ये मध्ये निवड झाली. ही परीक्षा पूर्व, मुख्य आणि मुलाखत आशा तीन विभागात होते अक्षय याने पूर्व आणि मुख्य परीक्षा २०१९ मध्ये दिली होती मुलाखत २०२१ मध्ये झाली . अक्षय चे शिक्षण बी ई सिव्हिल असून इंदूरच्या पद्मावती नगर च्या वस्ती शाळेत प्राथमिक शिक्षण झाले असून अगस्ती विद्यालयात दहावी अगस्ती महाविद्यालयात बारावी तर एमआयटि मध्ये इंजिनिअरिंग झाले असून सध्या भारतीय रेल्वे बोर्ड कल्याण येथे कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहेत. अक्षय हा सामाजिक कार्यकर्ते किसनराव नागुजी देशमुख यांचा नातू, सेवानिवृत्त शिक्षक शांताराम देशमुख व कृषी विद्यालय कळवण चे प्राचार्य रमेशराव देशमुख यांचा पुतन्या इंदुरी चे माजी उपसरपंच श्री एस. के. देशमुख यांचा सुपुत्र आहे.त्याचे या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.