
मंत्री शंकरराव गडाख यांच्या शेतकरी विकास पॅनेलची एकहाती सत्ता
सोनई—( विजय खंडागळे)
नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथील सेवा संस्थेच्या अध्यक्ष पदी देविदास मारुती वाघ यांची तर उपाध्यक्ष पदी सौ.सिंधुबाई ज्ञानदेव धानापुणे यांची बिनविरोध निवड झाली.
मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली. चेअरमन पदासाठी श्री.देविदास वाघ यांच्या नावाची सूचना श्री.त्रिंबक काशिनाथ सुकाळकर यांनी मांडली. तिला श्री. विलास आसाराम काकडे यांनी अनुमोदन दिले.व्हा.चेअरमन पदासाठी सौ .सिंधुबाई ज्ञानदेव धानापुणे यांच्या नावाची सूचना श्री.राजेंद्र पंढरीनाथ गायकवाड यांनी मांडली,त्यास श्री. विलास भानुदास काळे यांनी अनुमोदन दिले.
दूध संघाचे संचालक त्रिंबक सुकाळकर, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र गायकवाड,राधाकिसन वाघ,प्रशांत सुकाळकर,नामदेव सुकाळकर, संभाजी कोतकर, केशवराव कोतकर,कैलास पिटेकर,बाबासाहेब सुकाळकर, मोहनराव सुकाळकर,दादा वाघ,भारत पिटेकर,अशोक बर्डे,बापूराव गायकवाड, डॉ. सुरेश सुकाळकर,शैलेश पाटील,सुनील कोतकर, धनंजय गरड, राजू शेळके,गणेश गायकवाड, जयसिंग गायकवाड,यांनी परिश्रम घेतले. विलास काकडे,विलास काळे,मोहन सकट, कांताबाई आठरे,वछलाबाई दिघे, त्रिंबक भदगले,जनार्दन पिटेकर निवडून आले आहेत.
या वेळी पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला .
संस्थेचे माजी अध्यक्ष बद्रीनाथ चिंधे, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, माजी चेअरमन सुरेश सुकाळकर, बाबासाहेब सुकाळकर, राधाभाऊं वाघ,शिलु सुरडे,कैलास पिटेकर ,जैशिंग गायकवाड, यांच्यासह शेतकरी विकास पॅनलचे कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक गोकुळ नागरे तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव व्ही.एम.खंडागळे यांनी काम पाहिले.
सर्वाना विश्वासात घेऊन शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतला जाईल असे नूतन अध्यक्ष-देविदास वाघ,यांनी सांगितले.