
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी “अशोकराव देशमुख” तर व्हा.चेअरमन पदी “शरदराव चौधरी” यांची एकमताने बिनविरोध निवड..!!
अकोले तालुक्यातील विविध सहकारी संस्थेना,शेतकरी बांधवांना, उद्योजकांना आर्थिक सहाय्य करण्यास नेहमीच अग्रेसर असणाऱ्या तसेच अकोले तालुक्याची कामधेनू अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या जीवन घडणीत फार मोठा वाटा असलेल्या, ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन शेती , दूध ,ग्रामीण उद्योग, घरबांधणी यासाठी माफक दरात पतपुरवठा करणारी “अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची” चेअरमन व व्हा.चेअरमन पदांची निवड अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे “चेअरमन” तसेच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक श्री.सिताराम पाटील गायकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली “चेअरमनपदी” अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक व श्री सद्गुरू यशवंतबाबा चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री.अशोकराव देशमुख(आण्णा) तर “व्हा.चेअरमनपदी” अमृतसागर दुध संघाचे संचालक श्री.शरदराव चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली
यावेळी अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक, सभासद,अकोले बाजारपेठेतील उद्योजक,उंचखडक बुद्रुक व आंभोळ गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीबाबत सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
