अहमदनगर

मोदी सरकारने महिला सशक्तीकरणाला बळ दिले- भाजपा जिल्हा अध्यक्ष अश्विनी थोरात

अहमदनगर प्रतिनिधी

बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी, मिशन इंद्रधनुष यासारख्या योजनांद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महात्मा जोतिबा फुले यांचे महिला सशक्तीकरणाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने निर्धाराने पावले टाकली आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे महिला जिल्हा अध्यक्ष अश्विनी थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय जनता पार्टीच्या ४२व्या स्थापना दिनानिमित्त मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मोदी सरकारच्या धोरणांमुळे स्त्री भ्रुणहत्येचे प्रमाण कमी झाले असून महिलांचे लिंग गुणोत्तरातील प्रमाण वाढले असल्याची माहिती त्यांनी दिली.

श्री. अश्विनी थोरात म्हणाल्या की, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत टपाल कार्यालय आणि बँकांमध्ये २ कोटी ८६ लाख ७४ हजार ८७३ एवढी खाती उघडण्यात आली आहेत. उज्ज्वला योजनेंतर्गत स्वयंपाकासाठीचा गॅस सिलेंडर मोफत दिला जात असल्यामुळे कोट्यावधी महिलांची धुरामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्तता झाली आहे. पंतप्रधान मातृ वंदना योजनेचा २.७४ कोटी गर्भवती महिलांना फायदा झाला आहे. या योजनेनुसार गर्भवती महिलांच्या बँक खात्यांत ५ हजार रुपये जमा केले जातात. त्याचबरोबर मुद्रा योजनेंतर्गत दिल्या गेलेल्या कर्जांपैकी ७५ टक्के कर्ज महिला कर्जदारांना दिली गेली आहेत.

मोफत शिलाई मशीन वाटप योजनेद्वारे शहरी आणि ग्रामीण भागातील गोर-गरीब, वंचित घटकातील महिलांना शिवण यंत्रे मोफत दिली जाणार आहेत. प्रत्येक राज्यातील ५० हजार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. २० ते ४० वयोगटातील महिलांसाठी ही योजना लागू आहे, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मुस्लीम महिलांवर अन्याय करणारी तीन तलाक पद्धती मोदी सरकारने रद्द केली आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या शैक्षणिक विकासासाठी आखलेल्या विविध योजनांमुळे मुस्लीम मुलींचे शैक्षणिक गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानाला गती देण्यात आली आहे. या अभियानात ७५.६१ लाख स्वयंसहाय्यता गटांचा सहभाग आहे. या अभियानात ८.२४ कोटी महिला सहभागी झाल्या आहेत.

२०१२ मध्ये एक हजार पुरुषांमागे महिलांची संख्या ९०७ एवढी होती. मोदी सरकारच्या धोरणामुळे ही संख्या आता १ हजार २० झाली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक झाली आहे असे भाजपाच्या महिला जिल्हा अध्यक्ष अश्विनी थोरात यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button