अहमदनगर

प्रतिभाताई खेमनर हिची उपविभागीय जलसंधारण अधिकारी म्हणून निवड !

दत्तात्रय शिंदे

माका प्रतिनिधी

अंभोरे ता.संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील प्रतिभा सखाराम खेमनर हिची महाराष्ट्र अभियांत्रिकी 2019 मध्ये घेण्यात आलेल्या स्थापत्य गट मुद्रक व जलसंधारण विभागाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवून तिची महाराष्ट्र राज्याच्या उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट मुद्र व जलसंधारण विभागात क्लास वन अधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली आहे.
सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेच्या भाऊसाहेब गुंजाळ पाटिल सह्याद्री विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री सखाराम मंजाबापू खेमनर यांची कन्या असून कुमारी प्रतीक्षा खेमनर हीचे आंबोरे येथे प्राथमिक शिक्षण तर संगमनेर येथे सह्याद्री विद्यालय जूनियर मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेतले व अमृतवाहिनी अभियांत्रिकी कॉलेज अमृतनगर येथे अभियांत्रिकी पदवी विशेष प्राविण्य श्रेणीत संपादन करून अमृतवाहिनी कॉलेजात प्रथम तर पुणे विद्यापीठात तृतीय रँक मिळवला विविध स्पर्धांमध्ये कठोर परिश्रम जिद्दीने व मेहनतीने यश प्राप्त केले महाराष्ट्र राज्य महावितरण विभागाच्या अभियांत्रिकी इंजीनियरिंग पदावर आदर्शपणे काम केले आहे. नुकतीच तिची उपविभागीय मुद्रक व जलसंधारण अधिकारी या पदावर क्लासवन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे तिच्या या यशाबद्दल प्रतिभाताई यांच्या निवडीबद्दल नक्कीच समाजामधिल मुली ताईंचा आदर्श घेऊन ताईंच्या पावलावर टाकुन आपले यश संपादन करतील असे प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांनी म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button