महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी गाडगे तर सचिव पदी सुरेश खोसे पाटील यांची निवड

पारनेर तालुकाध्यक्षपदी संतोष तांबेंची निवड .
दत्ता ठुबे
पारनेर – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी दत्ता गाडगे यांची तर जिल्हा सचिवपदी दैनिक पारनेर समर्थ चे संपादक सुरेश खोसे पाटील आणि पारनेर तालुका अध्यक्षपदी संतोष तांबे यांची निवड करण्यात आली
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हा पदाधिकारी निवडी संदर्भात प्रदेश सचिव विश्वासराव आरोटे यांनी प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या आदेशान्वये शिर्डी येथे जिल्ह्यातील सदस्यांची बैठक घेण्यात आली . यावेळी नगर जिल्हाध्यक्ष पदी दत्ता गाडगे तर सचिव पदी दैनिक पारनेर समर्थ चे संपादक सुरेश खोसे पाटील आणि पारनेर तालुकाध्यक्ष पदी संतोष तांबे , नगर जिल्हा निवड समिती च्या अध्यक्षपदी फायकत अली सय्यद यांची निवड करण्यात आली .
या निवडी बिनविरोध व खेळीमेळीत करण्यात आल्या ,प्रदेश सचिव विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून निवडीचे पत्र देण्यात आली .
या प्रसंगी प्रदेश सचिव विश्वासराव आरोटे म्हणाले की , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नावात बदल करून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हे नाव ठेवण्यात आले असून याची सर्वांनी नोंद घ्यावी . संघटनेच्या नव नियुक्त जिल्हा पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देताना पुढे म्हणाले की , काम करताना सर्वांना बरोबर घेऊन चला , सदस्य नोंदणी करून संघटना वाढवा , जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकारां पर्यंत पोहचा , अडचणीत मदत करा , प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात वृक्षारोपण , गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , माजी सैनिकांचा सन्मान , पत्रकार बांधवांचा गुणगौरव ,वही वाटप , डोळ्यांचे शिबीर आणि इतर समाजभिमुख उपक्रम राबविण्याचेही विश्वासराव आरोटे यांनी आवाहन करून ते पुढे म्हणाले की , आपली संघटना मोठी असून तिचा नावलौकिक वाढविण्यासाठी एकजूटीने काम करा , गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्या , असे ते म्हणाले .
यावेळी ही निवडी ची प्रक्रिया प्रदेश सचिव विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली , तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांना मदत केली . या बैठकीला पत्रकार संतोष कोरडे , वसंतराव रांधवण , गंगाधर धावडे , सुधीर पठारे, ॲड . सोमनाथ गोपाळे , संपतराव वैरागर , सचिन जाधव , ठकसेन गायखे , नितीन परंडवाल , दिपक वरखडे , महेश शिंगोटे , गंगाधर फटांगडे , चंद्रकांत कदम आणि जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे , प्रदेश संघटक संजय भोकरे , प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव व इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत .