सारोळे पठार येथे नवभारत कन्या निवास नुतन इमारतीचे उद्घाटन

अकोले प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित नवभारत कन्या निवास सारोळे पठार ता.संगमनेर नुतन इमारतीचे उद्घाटन संस्था अध्यक्ष माजी आमदार श्री .नंदकुमार झावरे , उपाध्यक्ष .श्री .दरे साहेब , सहसचिव.श्री विश्वासराव आठरे , संस्था विश्वस्त श्री .सिताराम खिलारी ,डाॕ.श्री .चंद्रकांत मोरे अॕड.दिपलक्ष्मी म्हसे या मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला

याप्रसंगी झावरे साहेबांनी मुलींशी हितगुज साधुन समस्या समजावून घेतल्या. समाजातील दानशुर व्यक्ती व संस्था यांच्या कडून वसतिगृहास वस्तू स्वरूपात मदत मिळाल्याने अधिक्षिका श्रीमती एस.बी. नवथर व प्राचार्य श्री . प्रकाश खेमनर यांचे कौतुक केले
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष .श्री .दरे साहेब यांनी भौतिक सुख सुविधा बरोबर शैक्षणिक गुणवत्ता बाबत कौतुक केले तसेच संस्थेचे सहसचिव श्री .विश्वासराव आठरे साहेब यांनी करोणाच्या काळात शिक्षण आॕनलाईन पद्धतीने झाल्याने विद्यार्थ्यांचा सराव करून घेऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सामुदायिक प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे नमुद केले .
या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश खेमनर , भाऊराव धोंगडे विश्वास पोखरकर, तुकाराम कोरडे, बाळासाहेब डगळे, रघुनाथ मेंगाळ, गंगाराम पोखरकर,संजय ठोकळ,भारत हासे, संतोष भांगरे ,आप्पासाहेब दरेकर , हेमंत बेनके , कृष्णा वर्पे ,कदम सर विठ्ठल फटांगरे, सलालकर सर, मंगेश औटी, मनोहर कचरे , मोहन वैष्णव ,औटी सर आदी उपस्थित होते .