अहमदनगर

खरवंडी कासार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अशोक आव्हाड

पाथर्डी प्रतिनिधी

आजतागायत भारत देश संघटित ठेवून भारताचे अखंडत्व टिकविण्याचे काम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. डॉ.आंबेडकरांच्या तत्त्वानुसार सर्व जाती धर्मातील प्रेम आणि ऐक्य या गोष्टी तेवत ठेवण्याचे कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.
खरवंडी कासार येथील बौद्ध विहार या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती साजरी उत्साहात साजरी करण्यात आली

.या कार्यक्रम प्रसंगी मा.सरपंच यशोदास सोनवणे, वंचित संघटक चे दत्ता आंदुरे, टायगर फोअर्सचे अध्यक्ष दादासाहेब सोनवणे, महाराणा प्रताप संघटनाचे अंबादास चव्हाण, दयावान सोनवणे, आयुब भाई पठाण, कांता सेठ पवळे, फिरोज भाई तांबोळी, बाळासाहेब पवळे, करीम तांबोळी, अकिल तांबोळी, लहु दराडे ,अर्जुन पवार, मच्छिंद्र नागरे, गणेश पडवळकर, भास्कर सोनवणे, अर्जुन पडवलकर, मुलचंद खेडकर, शाकिर सर, युसुफभाई बागवान, सलीम भाई बागवान, भारत सोनवणे, राजू सोनवणे, वसंत खेडकर, मयूर जायभाये, आदर्श सोनवणे,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना या.सरपंच वसंत खेडकर म्हणाले की ज्या विश्वरत्नाने ज्ञानाची ज्योत तेवत ठेवली,ज्ञानाचे कार्य घराघरापर्यंत पोचवले अशा महामानवाला त्रिवार अभिवादन करतो.यानंतर
मा.सरपंच यशोदास सोनवणे म्हणाले की डॉ.आंबेडकर यांनी शिक्षणाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी केला असून शिक्षण हे समाज बदलाचे साधन आहे. खरवंडी येथील बंधू भगिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता अंदुरे, सूत्रसंचालन दादासाहेब सोनवणे तर आभार लहु दराडे यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button