
पारनेर प्रतिनिधी
आषाढी एकादशी निमित्त गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अर्चना रायते या महिलेने ताटामध्ये पाणी घेऊन रांगोळीने विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती साकारली. या महिलेने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे कडूस गावातील ग्रामस्थांच्या वतीने या महिलेचे कौतुक करण्यात आले आहे. या ठिकाणी सुरेखा काळे, कुसुम काळे, शोभा काळे तसेच गावातील संपूर्ण ग्रामस्थ व महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
