अहमदनगरक्राईम

दागदागिने व मोटारसायकल चोरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या !

अकोले पोलीसांची कारवाई

एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत

अकोले प्रतिनिधी

घोडसरवाडी (समशेरपुर ता अकोले ) येथील
मनोज सोपान घोडसरे (वय 18 वर्ष धंदा शिक्षण ) रा घोडसरवाडी ता अकोले यांचे राहते घरातुन श्रावण किसन बरमाडे याने एकुण- 1,85,000 /- रु.कि. रोख रक्कम, सोन्याचे दागदागिने व एक मोटार सायकल असा मुददेमाल चोरुन नेली होता, त्या बाबत अकोले पोलीस स्टेशन येथे दिनांक 13/04/2022 रोजी गुन्हा रजि नंबर 150/2022, भा द वी कलम 381 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

या गुन्हयाचे तपासाकरीता एक पोलीस पथक तयार करुन तात्काळ तपास सुरु करुन दिनांक 16/04/2022 रोजी अकोले पोलीस स्टेशन च्या पोलीस पथकाने टिटवळा ता.कल्याण,जिल्हा ठाणे येथे जावून आरोपीच्या ठावठिकाणाबाबत माहीती घेतली व सापळा लावुन त्यास ताब्यात घेतले श्रावण किसन बरमाडे वय 38 वर्षे रा सिद्दी विनायक चाळ कोलशेत रोड आझादनगर जि ठाणे असे त्याचे नाव असून त्याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास दिनांक 16/04/2022 रोजी अटक करुन दिनांक 19/04/2022 रोजी पावेतो त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन गुन्हयाचा तपास केला असुन त्याच्याकडून पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असतांना त्याने गुन्हयात चोरी रोख रक्कम, सोन्याचे दागीने व चोरलेली मोटार सायकल असा एकुन 1,05,000/- रु. कि. मुददेमाल हस्तगत केला असुन त्याची रवानगी पोलीस कस्टडीत कर न्यात आली .

सदर ची कारवाई श्री, मनोज पाटील , पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. राहुल मदने उप विभागीय पोलीस अधीकारी संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशन चे सपोनि मिथुन घुगे, पोलिस उपनिरीक्षक भुषन हांडोरे, पोना रविंद्र वलवे, पोना फुरकान शेख , पोकॉ अविनाश गोडगे, पोकॉ, सुयोग भारती, पोका आनंद मेड, पोका संदिप भोसले, यांनी केली आहे.

——////—-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button