ना गडाख यांच्या प्रयत्नातून नेवासा तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना खावटी वाटप!

नेवासा प्रतिनिधी
नामदार शंकरराव गडाख साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने आदिवासी बांधवांसाठी खावटी योजनेच्या अंतर्गत दोन हजार रु. बँक खात्यात अनुदान व दोन हजार रुपयांचे किराणा किट वाटप मा.सभापती सौ.सुनीताताई शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.. मंत्री गडाख यांनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरल्यामुळे २०१४ पासून बंद पडलेली खावटी अनुदान योजना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने राज्यात पुन्हा सुरू झाली…. नामदार साहेबांच्या पाठपुराव्यामुळे, नेवासे तालुक्यातील १७५९ आदिवासी कुटुंबांना ७० लाखाचे अनुदान या आधी मिळालेले होते….
आज या योजनेअंतर्गत, ८८ आदिवासी कुटुंबीयांना १ लाख ७६ हजार रुपये अनुदान खात्यात व १ लाख ७६ हजार रुपये, किराणा किटचे असे, एकुण ३,५२,००० रू. चे, वाटप करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती रावसाहेब पा.कांगुणे, नगराध्यक्ष सतीश पिंपळे, मा.उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, पं.स.सदस्य विक्रमआप्पा चौधरी, नगरसेवक रणजितभाऊ सोनवणे, जितेंद्रभाऊ कुऱ्हे, संदीपभाऊ बेहळे, अर्चनाताई कुऱ्हे, दिनेशभाऊ व्यवहारे, समाज कल्याण विभागाचे लष्कर साहेब, गायकवाड सर, जालिंदर गवळी, भोईटे मॅडम व तालुक्यातील आदिवासी बांधव व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते… त्यावेळी, उपस्थित लाभार्थ्यांनी नामदार गडाख साहेब यांचे आभार मानले…