इतर

सातेवाडी येथे मुक्ताई यात्रा सोहळा संपन्न

कोतुळ प्रतिनिधी

सातेवाडी गावचे भूषण केशव बुळे साहेब यांच्या सकल्पनेतून, गावातील नोकरदारांच्या सहकार्याने, बिरसा ब्रिगेडच्या वतीने आखाड्यात आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमा कुस्ती काढणाऱ्या पहिलवानांना देऊन आखाडा राघोजीमय करण्यात आला.

सातेवाडी ग्रामदैवत मुक्ताई यात्रेनिमित्त दि. 19/4/2022 वार -मंगळवार रोजी यात्रा कमिटीने छान नियोजन करुन जंगी कुस्त्यांचा आखाडा आयोजित करण्यात आला होता. अकोले तालुक्यात सातेवाडी येथील कुस्ती आखाड्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठी गर्दी प्रेक्षकांची झाली होती.अकोले तालुक्यातून अनेक पहिलवानांबरोबरच इगतपुरी, सिन्नर, तालुक्यांतूनही पहिलवानांनी उपस्थिती दाखवून सहभाग घेतला.
आखाड्यात 100 रुपयांपासून कुस्त्यांना सुरुवात करुन शेवटची कुस्ती 2100 रुपयांपर्यंतची झाली.

यावेळी बिरसा ब्रिगेड सातेवाडीच्या वतीने निकाली कुस्ती काढणाऱ्या पहिलवानांस प्रोत्साहन म्हणून सह्याद्रीचा रक्षणकर्ता ढाण्या वाघ, इंग्रजांचा -जुलमी सावकारांचा कर्दनकाळ आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे यांची प्रतिमा देण्यात आल्या. बिरसा ब्रिगेडचे मार्गदर्शक, समन्वयक, ज्येष्ठ मार्गदर्शक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, इतर पदाधिकारी व सभासद यांनी योग्य असे नियोजन केले . अध्यक्ष किसन दिघे, उपाध्यक्ष, पंढरीनाथ दिघे, पदाधिकारी डॉ.काशिनाथ मुठे, दत्तू दिघे, अंकुश शिळकंदे, जिजाराम मुठे, लक्ष्मण दिघे, दिनकर दिघे, लक्ष्मण वायळ यांची उपस्थिती होती. तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक शिवराम दिघे मा. सरपंच, पांडूरंग कचरे मा. सरपंच पळसुंदे, लुमा लक्ष्मण मुठे, विठ्ठल गोविंदा दिघे, तसेच समन्वयक धर्मा दिघे सर, भास्कर दिघे सर, केशव मुठे , दुलाजी दिघे चेअरमन सातेवाडी सोसायटी, किसन मुठे वायरमन , भावका मुठे, सखाराम भाऊ मुठे, श्रावण आमृता मुठे , एकनाथ मुठे, लक्ष्मण मुठे मेजर , पुनाजी मुठे हावलदार यांच्या हस्ते प्रतिमा पहिलवानांस देण्यात आल्या. व ककुस्ती आखाडा राघोजीमय करुन या वीराचे स्मरण सह्याद्रीतील सातेवाडी ता. अकोले, जि. अहमदनगर येथे करण्यात आले.

तसेच पहिलवानांना प्रोत्साहन म्हणून तरुण मित्र मंडळ मोरवाडी यांच्या वतीने निकाली कुस्ती काढणाऱ्या पहिलवानांना ढाल देण्यात आली.

तसेच बिरसा ब्रिगेडचे शिलेदार, मार्गदर्शक डॉ. काशिनाथ मुठे यांनी वैयक्तिक रक्कम जाहिर करुन कुस्त्या लावल्या.

कुस्तीला यात्रा कमिटीच्या वतीने रोख रक्कम , वीर राघोजी प्रतिमा व ढाल यांमुळे आखाड्याचे वातावरण अतिशय रोमांचक व गर्दीचे झाले होते. जवळ जवळ 53 कुस्त्या या आखाड्यात घेण्यात आल्या. व 100 च्या आसपास पहिलवानांनी सहभाग नोंदवला.
यात्रा कमिटीने अतिशय छान नियोजन केले होते. त्यामुळे नागरिक ,पाहुणे व पहिलवान मंडळींनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button