जलसंपदा विभागाच्या सहाय्यक अभियंतापदी दुर्गा कानवडे !

अकोले प्रतिनिधी
। म ्हाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने जलसंपदा विभागाच्या सहाय्यक अभियंतापदी कु. दुर्गा सोपान कानवडे हिची निवड झाली आहे.
संगमनेर तालुक्यातील सावरचोळ गावातील कु. दुर्गा कानवडे हिने कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन न घेता स्वतंत्र्य अध्ययनाच्या जोरावर यश मिळवले आहे.
पूर्व परीक्षा , मुख्य परीक्षाआणि मुलाखत आशा तीन विभागात परीक्षा होत असते कु. दुर्गा हिने पूर्व आणि मुख्य परीक्षा 2019 मध्ये दिली होती. मुलाखत 2021 मध्ये झाली होती. दुर्गा ही अगस्ती साखर कारखाना पतपेढी येथील माजी व्यवस्थापक कै. सोपान बाळासाहेब कानवडे याची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल कारखान्याचे चेअरमन व माजी मंत्री मधुकरराव पिचड, व्हा. चेअरमन सीताराम पाटिल गायकर यांनी अभिनंदन केले.