रोटरी क्लब ऑफ नासिक मार्फत अतिदुर्गम आदिवासी गावात सौर पथदीवे

नाशिक प्रतिनिधी
आदीवासी पाडे किंवा गावे अतिदुर्गम भागात आहेत जिथे जंगले आहेत , हिंस्त्र श्वापदांचा मुक्त संचार आहे अंधार असल्यामुळे हि जंगली हिंस्त्र श्र्वापदे आपले भक्ष्य शोधण्यासाठी या गावात मध्ये , पाड्यात येतात गाय , शेळी बकरी , कोंबड्या इत्यादी वर हल्ला चढवून हि श्र्वापद आपली भूक भागवतात , कधी कधीतरी मानवी वस्त्या मध्ये शिरून नरभक्षक असा हल्ला होतो . जर अश्या वस्त्या मध्ये पाड्यात वीज असली तर वीज प्रकाशामुळे हि हिंस्त्र स्वापदे सहज हल्ला करू शकत नाही आणि जरी झाला तर वीज प्रकाशात गावकरी या प्राण्याची चाहूल लागून योग्य ती बचावात्मक खबरदारी घेऊन होणारे नुकसान टाळू शकतात , या पार्श्वभूमी चा विचार करून
आदिवासी भागातील विजेचा प्रश्न सुटावा अंधाराची भीती दूर करने साठी रोटरी क्लब ऑफ नासिक ने नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी गावांत सौरपथदिव्यांचे वाटप केले

सी. एस. आर. योजने अंतर्गत ऑटोकॉम्प लिमिटेड या कंपनी बरोबर सामंजस्य करार करीत सौर उर्जे वर चालणारे पथदीप बसविण्या चा उपक्रम हाती घेतला . ऑटोकॉम्प कंपनी ने या उपक्रमाचा सर्व बाजूंनी विचार करून , सगळा तपशील मागवून त्याचा अभ्यास करून रोटरी क्लब ऑफ नासिक चा प्रस्ताव मंजूर करून फेब्रुवारी २०२२ मध्ये कंपनीच्या सी. एस आर. फंडातून आर्थिक मदत केली. रोटरी क्लब ऑफ नासिक ने त्वरित उपाययोजना करत कहांडळ , वांगंन , भाटी , खीर, भेंसेट , हेडमाळ , बेहेड , आणि कोयल या नऊ आदिवासी वस्त्या मध्ये १८ सौर उर्जेवर चालणारे पथदीप १२ एप्रिल २०२२ मध्ये बसवून ते कारण्यान्वित केले , हे सर्व गाव अतिशय दुर्गम भागात असून जवळ जवळ गुजरात सीमे जवळ आहेत . सौरदिवे च्या उजेडाने गावकरी अतिशय आनंदी आणि समाधानी झाले आहेत , त्यांच्या कडून अजून असे पथदीप बसविण्या साठी विनंती प्रस्ताव रोटरी क्लब कडे येत आहेत , त्यावर जरून विचार करून या पुढे हि अशीच मदत करण्याचा रोटरी क्लब ऑफ नासिक आणि ऑटोकॅम्प कंपनी चा मानस असल्याचे सांगण्यात आले
