
हेरंब कुलकर्णी आणि जे डी आंबरे यांना पुढे करून विरोधक राजकारण करत आहे
अकोले -प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी आदरणीय पिचड साहेब यांनी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळात फेरबदल केले, आता हे जे बदल झालेत ही पहिली वेळ नसून प्रत्येक ५ वर्षाला कमिटीत काही बदल होत असतात, परंतु यामागे यापूर्वी निवडीत दोष कुणाला दिसले नाही आणि आता जसे अफगाणिस्तानातून लोक आणून कमिटी स्थापन केल्यागत काही सूज्ञ मंडळी थयथयाट करत असल्याचा आरोप अमृतसागर दुध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यानी केला आहे.
श्री . वाकचौरे यानी म्हटले आहे की, .हेरंब सरांचे आणि आंबरे पाटील यांचे नाव समोर करून काही लोक राजकारण करतायेत..पण यावेळी कुलकर्णी सर आणि आंबरे पाटील कुठलीही नकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसत नाही.फक्त द्वेषापोटी भडकावू भाषेचा वापर करून संस्थांना वेठीस धरण्याचा कार्यक्रम काही मंडळींनी तालुक्यात सुरू केलेला आहे. काही दिवसांपासून काही मोजके लोक तालुक्यातील संस्थांना आणि तहसीलदार तसेच इतर अधिकाऱ्यांनाही त्रास देण्याचं काम करतायेत. यावरून हे सिद्ध होतंय की यांना फक्त नाहक त्रास देने हाच उद्योग आहे, व यांच्या चुकीच्या बाबींना काही नेते मंडळी समर्थनही देत आहे अगस्ती सहकारी साखर कारखाना आणि अकोले एज्युकेशन सोसायटी ह्या तालुक्यातील प्रमुख संस्था आहेत, यामध्ये पूर्वी केव्हाही राजकारण झालं नाही, किंबहुना सदस्य कोण आहेत हे जनतेला माहीत पण झालं नाही. म्हणूनच आज संस्था सदन झालेली बघायला मिळतेय. सहकार आणि सेवाभावी संस्थेत काम करत करताना आदरणीय पिचड साहेबांनी कायमच उन्नतीचा विचार केलेला आहे. एज्युकेशन संस्था कालकथीत. दादासाहेब रुपवते ,कै. भाऊसाहेब हांडे , कै.यशवंतराव भांगरे , कै. लालचंदजी शहा , कै.बुवासाहेब नवले , कै. बा.ह.नाईकवाडी यांच्या पुढाकारातून उभी राहिली यात दुमत नाही परंतु मधुकरराव पिचड आमदार तथा मंत्री असताना संस्थेसाठी इमारती, अनुदान, नवनवीन कोर्सेस आणि इतर शाखा सुरू करणे याबाबत अतिशय मोठं काम केलं, यावेळी अनेक मान्यवरांचं सहकार्य त्यांना लाभलं. सीताराम पाटील गायकर हे पण ह्या सर्व संस्थांचा अविभाज्य घटक आहेत आणि त्यांना सर्व वस्तुस्थिती ज्ञात आहे, परंतु त्यांना न विचारता फक्त राजकीय द्वेष व्यक्त करण्यासाठी पिचड साहेबांवर आरोप करण्याचा ठेका काही लोकांनी तालुक्यात घेतलेला बघायला मिळतो. आता संचालक मंडळात आमदार यांचे अनेक निकटवर्तीय आहेत की ज्यांच्या सोबतीने ते निवडणूका लढवतात पण आज आमदार सर्वानाच बरबटलेले म्हणतायत, याचा अर्थ तालुक्याने काय घ्यायचा ? आपण कायमच विकास आणि उन्नतीबाबत भाष्य करतात तर मग ही असली वक्तव्य करून चुकीच्या आंदोलनांना प्रोत्साहित करून तालुक्यातील संस्था कमजोर होतील याबाबत आपण का विचार करत नाही हा प्रश्न माझ्यासारख्या एक सर्वसामान्य व्यक्तीला भेडसावत आहे. काही महिन्यांपूर्वी कारखान्याच्या विरोधात केलेल्या उपद्रवाला तालुक्यातील जनतेने कुठलाही प्रतिसाद दिला नाही यावरून तरी ह्या मंडळींना सद्बुद्धी येणे अपेक्षित होतं. अकोले एज्युकेशन सोसायटीबाबत विद्यार्थी आणि पालक हे अतिशय सकारात्मक आहेत तसेच आजपर्यंत हजारो विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले बघायला मिळतात, या सर्वांची केव्हाही तक्रार ऐकायला मिळत नाही. विरोधात असतानाही शरद पवार साहेबांनी पिचड साहेबांच्या कामाचे कौतुक काही दिवसांपूर्वी केले, पिचड आयुष्यभर तालुक्यातील सर्वच विभागात जी विकासकामे केली त्याबाबत सकारात्मक दृष्ट्या भाष्य करण्याची नीतिमत्ता न ठेवता साहेबांचं वय वर्षे ८३ असताना त्यांच्यावर गलिच्छ आरोप करण्यात धन्यता माणणाऱ्यांचाही भविष्यकाळ वाईट असेल यात तिळमात्र शंका नाही, शर्यत ही विकासाबाबत असावी की ज्याने शेतकरी, गोरगरीब नागरिक, व्यापारी, नोकरदार समाधानी होईल.. जी पाटपाण्याची, आरोग्याची, विजेची, वाडीवस्त्यांवर रस्ते नेण्याची, शाळा, आश्रमशाळा उभी करण्याची कामे पिचड साहेबांनी केली त्याची हे टीका करणारे सर्वजण साक्षीदार आहेत.आमदार पिताश्री गुरुजी यांना सोबत घेऊन विविध पदांवर बसविण्याचे काम साहेबांनी केले व आज तुम्ही म्हणतायत की पिचडांनी आजपर्यंत फक्त बरबटलेल्या लोकांना पदे दिली.विरोध हा तात्विक असावा आणि त्याबाबत लढाही योग्य मार्गाने असावा, व्यक्तिद्वेष ठेवून विरोध केल्यास तालुक्यातील संस्थांचे अतिशय मोठे नुकसान होईल आणि यात ज्यांना रोजगार प्राप्त झालेला आहे त्यांनाही संकटाला सामोरं जावं लागेल याचा विचार होणं आवश्यक आहे. एज्युकेशन संस्थेत विविध संघटनेतील लोकांना सोबत घेऊन चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न साहेबांनी केलेला आहे. तालुक्यातील सर्व सुज्ञ नागरिकांची मानसिकता बघता आता ह्या द्वेषात्मक आंदोलनांना आणि चुकीच्या वक्तव्यांना तालुक्यातील जनता नक्कीच पाठिंबा देत नाही.असेही रावसाहेब पाटील वाकचौरे यानी या म्हटले आहे.