महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या महीलाश्रम वसतिगृहात भरारी-२०२३ हाॅस्टेल डे उत्साहात संपन्न

पुणे – विद्यार्थीनींनी अभ्यासाबरोबरच तंदुरुस्त शरीर आणि मनाने खंबीर राहण्याचे लक्ष दिले पाहिजे असे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालक सविता काजरेकर यांनी सांगितले.
संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहाच्या भरारी हाॅस्टेल डे कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
संस्थेच्या उपकार्याध्यक्ष विद्या कुलकर्णी, माजी विद्यार्थीनी पोलीस निरीक्षक जान्हवी आचार्य प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. वसतिगृहाच्या प्रमुख सुमन तांबे-यादव तांबे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपप्रमुख पूनम पोटफोडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.

सूत्रसंचालन कु. प्राची कुडे आणि निवेदिता साळुंके या विद्यार्थीनींनी केले.
केसवर्कर कांचन फाळके यांनी वसतिगृहातील मुलींना विविध प्रकारे मदत करणाऱ्या संस्थांची व व्यक्तींची माहिती सांगितली. या सर्वांना संस्थेचे प्रकाशनाची पुस्तके देऊन सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
इ.५वी ते ८वी च्या मुलींची शाखा तसेच संस्कार पाठ घेणाऱ्या मुलींचे बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.
दिवंगत वत्सला नायडू यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारे वत्सल स्मृती पुरस्कार वसतिगृहातील मेट्रन संगीता जाधव, स्वयंपाकीण भारती देशमुख, मदतनीस भारती चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.

नृत्यस्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षीसे देण्यात आली. त्यानंतर ऐश्वर्या यादव १२वी, अनुजा सुरवसे १२वी,
अस्मिता पिंगळे १०वी, समीक्षा शिंगन १२वी,
सिद्धी दसगुडे १०वी या मुलींनी मनोगत व्यक्त करताना वसतिगृहातील अनुभव सांगितले.
विद्याताई कुलकर्णी यांनी आपल्या वसतिगृहातील मुली कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच संस्थेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करणार असल्याचे सांगितले मुलींना मार्गदर्शन केले.
दिव्या लांडगे या विद्यार्थीनीने सर्व उपस्थितांचे आभार मानले.

—————–