ऊर्जामंत्री यांनी घेतली कंत्राटी कामगारांची बैठक

मुंबई -ऊर्जामंत्री .ना.डॉ.नितीन राऊत यांनी शुक्रवार दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता त्यांच्या मुंबईतील पर्णकुटी या बंगल्यावर वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ पदाधिकारी समावेत बैठक घेतली.
तिन्ही वीज कंपनीत वर्षानुवर्षे काम करत असलेल्या अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना पंजाब सरकार प्रमाणे कायम करावे. हा निर्णय होई पर्यंत रानडे समितीच्या अहवालाच्या धर्तीवर या कामगारांना कंत्राटदार मुक्त व वयाच्या 60 वर्षा पर्यंत रोजगाराची हमी द्यावी. कंत्राटदार जी आर्थिक पिळवणूक करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी संघटनेने मागणी केली.
रोजंदारी कामगार पद्धतीची मागणी संघ 2015 पासून करत आहे. त्याचा अहवाल आज संघटनेने ऊर्जामंत्री यांना दिला. या अहवालाचा व अन्य राज्यातील वीज कामगार विषयक अभ्यास करून या बाबत लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
या निर्णयाला मूळे कंत्राटदारांच्या जाचातून कामगार मुक्त होतील व वीज कंपन्यांचा देखील आर्थिक फायदा होईल असे संघटनेने नमुद केले आहे.
या मिटिंग साठी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष श्री नीलेश खरात, वीज कामगार महासंघाचे मार्गदर्शक मा.अण्णाजी देसाई कामगार महासंघाचे अध्यक्ष विठ्ठल भालेराव, महामंत्री अरुण पिवळ, प्रशांत भांबुर्डेकर, सुनील कासरे तसेच वीज कंत्राटी कामगार संघांचे कार्याध्यक्ष उमेश आनेराव, संघटनमंत्री राहुल बोडके, उपाध्यक्ष संदीप गवारी उपस्थित होते.