संगमनेर येथे जागतिक हिवताप दिन साजरा

संगमनेर प्रतिनिधी
आज सोमवार दिनांक २५ एप्रिल २०२२ जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून संगमनेर शहरातील सिध्दकला आयुर्वेदिक महाविद्यालय, संगमनेर येथे जागतिक हिवताप दिन साजरा झाला
संगमनेर ग्रामीण रुग्णालय, संगमनेर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, संगमनेर व संगमनेर तालुका आरोग्य8 विभाग, संगमनेर व सिध्दकला आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हिवताप दिन आयुर्वेदिक महाविद्यालय संगमनेर येथे.सहाय्यक संचालक,.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रविंद्र कानडे , वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार जर्हाड , डॉ.संदीप कचेरीया, यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सिध्दकला आयुर्वेदिक महाविद्यालयांचे सन्मानिय संचालक डॉ.नैमेश सराफ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका आरोग्य पर्यवेक्षक .श्री. माळी साहेब, प्राध्यापक डॉ.सौ.भावना गांगुर्डे प्राध्यापक डॉ.मतिन शेख सर उपस्थितीत सर्व सिध्दकला आयुर्वेदिक महाविद्यालयांचे विद्यार्थी यांना ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य पर्यवेक्षक श्री. विनायक वाडेकर, आरोग्य सेवक नितीन नेवासकर,,श्री.मनेश सांगळे, श्री.गणेश कोटकर यांनी मौलिक असे किटकजन्य आजाराविषयीचे मार्गदर्शन केले,व आजच्या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिवताप आजाराविषयीचे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेतून अनेक चित्राद्वारे विद्यार्थ्यांनी समाजाला अनेक महत्त्वाचे संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला, सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या प्राध्यापीका, डॉ.सौ.भावना गांगुर्डे मॅडम, प्राध्यापक डॉ.मतिन शेख,शहरी आरोग्य पर्यवेक्षक श्री.विनायक वाडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
