
अकोले /प्रतिनिधी
माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 27 एप्रिल रोजी अकोले तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अमृतसागर दुध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांनी दिली
.अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी,अकोले नगरपंचायत, अमृतसागर दूध संघ,वीरगाव येथील सुलोचना होमिओपॅथी हॉस्पिटल,भाजप ,युवा मोर्चा,
विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एक्सेल गॅस इक्युवपमेंट प्रा ली कंपनी मुबंईचे संचालक राजेंद्र गोडसे व स्वर्गीय जितेंद्र भाऊ पिचड प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वाढदिवसाच्या निमित्ताने अकोले येथील बस स्थानकावरील धुमाळ संकुल येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबीराचे उदघाटन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या शुभहस्ते व अकोले नगरपंचायत च्या नगराध्यक्षा सौ सोनालीताई नाईकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली व गगनगिरी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ हेमलताताई पिचड,भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, जि प अर्थ व बांध समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे,जि प सदस्य जालिंदर वाकचौरे, ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव, शिवाजीराजे धुमाळ, ऍड.के डी धुमाळ,ऍड.वसंतराव मनकर, सीताराम देशमुख, सभापती उर्मिला राऊत,उपसभापती दत्तात्रय देशमुख, अ ता एज्यु सोसायटी चे अध्यक्ष सुनिल दातीर,सेक्रेटरी सुधाकर देशमुख ,भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख ,भाजप शहराध्यक्ष सचिन शेटे,महिला तालुकाध्यक्ष रेश्मा गोडसे,व उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे,नगर पंचायतीचे सभापती शरद नवले,हितेश कुंभार,वैष्णवी धुमाळ,सौ. प्रतिभा मनकर,नगरसेविका शितल वैद्य, कविता शेळके,माधुरी शेणकर,जनाबाई मोहिते,तमन्ना शेख,सागर चौधरी,विजय पवार, उद्योजक नितीन गोडसे,यशवंतराव आभाळे, राजेंद्र डावरे,सुधाकर आरोटे,धनंजय संत,गोरक्ष मालुंजकर,राजेंद्र गवांदे,तहसीलदार सतीश थेटे,सहा पो निरीक्षक मिथुन घुगे, राजूर चे सहा पो निरीक्षक नरेंद्र साबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.याशिवाय भाजप युवा मोर्चा व स्वर्गीय जितेंद्र पिचड सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने अकोले पॉलिटेक्निक कॉलेजवरतसेच वीरगाव येथील सुलोचना होमिओपॅथी हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप,पौष्टिक आहार वाटप,अकोले नगरपंचायत च्या वतीने शहरातील सर्व अंगणवाड्यांना खाऊ वाटप,आदिवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य,व भोजन तर केळुगण येथील वृद्धाश्रमाला आरो प्लान्ट भेट दिली जाणार आहे.याशिवाय अकोले तालुक्यातील प्रवरा,आढळा,मुळा,आदिवासी भागात अंगणवाड्यांतील बालकांना खाऊचे वाटप केले जाणार आहे.
———-