राजापूर महाविद्यालयात विद्यार्थी पालक मेळावा संपन्न.

…..
संगमनेर प्रतिनिधी
प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी विज्ञान विभागाच्या वतीने विद्यार्थी पालक सहविचार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, याप्रसंगी प्रागतिक शिक्षण संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष ॲड.गोडसे , सेक्रेटरी मा. ॲड. कैलास हासे , स्कूल कमिटी चेअरमन श्री भाऊसाहेब हासे, संचालक श्री भारत शेलकर, श्री भानुदास सोनवणे ,प्राचार्य डॉ. सुभाष कडलग सर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
प्रस्ताविकामधे बोलत असताना प्राचार्य सुभाष कडलग यांनी नवीन शैक्षनिक धोरण, आंमलबजावणीसाठी पालक आणि विद्यार्थी यांचा सहसंबंध असणे आवश्यक आहे, असे सूचक वक्तव्य केले.विज्ञान विभाग प्रमुख सुभाष वर्पे यांनी शैक्षणिक वाटचालीची माहिती देऊन कौशल्याभिमुख शिक्षण काळाची गरज आहे असे मनोगतात व्यक्त केले.संस्थेचे सेक्रेटरी ॲड.कैलास हासे यांनी विद्यार्थी आणि पालक यांचे एकमेकांशी घट्ट नाते असावे ज्यातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी उपस्थित पालकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.त्यामध्ये सुरेखा नवले व श्रावण हासे यांनी महाविद्यालयीन शिक्षकांचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता हासे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.वैभव गडाख यांनी केले.