ग्रामीण

सावरगावच्या सरपंच पदी वैशाली चिकणे यांची बिनविरोध निवड

मिरवणुकीच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक मदत

दत्ता ठुबे

पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजले जाणारे गाव सावरगाव या गावच्या सरपंचपदी वैशाली पर्वती चिकणे यांची मंगळवार दि. ७ रोजी बिनविरोध निवड झाली.
सावरगावच्या तत्कालीन सरपंच सुरेखाताई मगर यांनी राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी सरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी वैशाली पर्वती चिकणे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता परंतु समोरून कोणताही उमेदवारी अर्ज न आल्यामुळे त्यांची सरपंचपदी निवड बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सरपंचपदी निवड झाल्यानंतर गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
या सरपंचपदाच्या निवड प्रक्रियेमध्ये प्रशासकीय अधिकारी उंडे, भालेकर व जगदाळे यांनी काम पाहिले.
या निवड प्रक्रियेमध्ये सावरगाव ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच प्रदीप गुगळे, मा. सरपंच सुरेखाताई मगर, शांताराम शिंदे, विष्णू माने, बाळासाहेब चिकणे, देवराम मगर, बाळासाहेब शिरतार, संतोष घनदाट, संतोष आचार्य व पर्वती चिकणे यांचे विशेष सहकार्य लाभले. गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ यांनी नवनिर्वाचित सरपंच वैशाली चिकणे यांचा सन्मान करत त्यांना पुढील वाटचालीसाठी यावेळी शुभेच्छाही दिल्या. चिकणे कुटुंबाने सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर अनावश्यक खर्चाला फाटा देत गावातील सामाजिक कार्यासाठी वर्गणी दिली.
दरम्यान सरपंचपदी निवड झालेल्या वैशाली चिकणे यांच्या कुटुंबाची गावच्या सामाजिक, अध्यात्मिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमी सहभाग असतो. सरपंचपदी निवड झाल्यानंतर वैशाली चिकणे यांनी यापुढील काळात सावरगावच्या विकासासाठी कटिबद्ध असून गावातील समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे मत व्यक्त केले तसेच गावातील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी यांचे यावेळी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button