राजूर येथील पीर बाबा उरूस व रमजान ईद शांततेत साजरा करा : पो. नि. नरेंद्र साबळे

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी :
राजूर येथील पीर बाबा उरूस सात ते नऊ मे दरम्यान होत आहे. हा उरूस शांततेत साजरा करावा, असे आवाहन राजूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी केले.
राजूर पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात ते बोलत होते
यावेळी राजूर ग्रामपंचायतीचे प्रशासक दिनकर बंड, ग्रामविकास अधिकारी बी. डी. नाडेकर, माजी सरपंच गणपत देशमुख ,संतोष बनसोडे, भास्कर येलमामे, तलाठी अजय साळवे, महावितरणचे कुटे, दत्ता भोईर, पोलिस हेडकॉन्स्टेबल विजय फटांगरे, महिला पोलीस कॉ. रोहिणी वाडेकर सुवर्णा शिंदे कैलास नेहे विकास मुंडे अशोक गाडे,तसेच अकील तांबोळी, परवेज शेख, इन्नूस तांबोळी मणियार, रानू मुर्तडक, अजय पोटे आदी उपस्थित होते
माजी सरपंच बनसोडे म्हणाले, की गावात शांतता प्रिय आहे सर्व ग्रामस्थ यांनी नियम पाळवे . पोलिस अधिकारी नरेंद्र साबळे यांनी पोलिस ठाण्याला उत्कृष्ट पुरस्कार मिळवून देऊन गावाची मान उंचावली आहे. त्यामुळे राजूरमध्ये एकोप्याची भूमिका घेऊन काम करावे प्रशासक बंड यांनी उरूस संदल कार्यक्रमात विविध सुविधा उपलब्ध करून देऊ असे सांगितले दोन्ही संदल एका दिवशी काढावे तसेच डीजे लावू नये रात्री साडेनऊ वाजता मिरवणूक थांबावी अशी आव्हान श्री नरेंद्र साबळे यांनी केले पीर बाबा चादर निघेल कोणत्याही झेंडे लावण्याची परवानगी राहणार नाही असेही ते म्हणाले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
