सामाजिक

राहुल राऊत यांना “पर्यावरण प्रेमी पुरस्कार” प्रदान

अकोले प्रतिनिधी
कविता म्हणजे प्रबोधन प्रतिष्ठाण, संगमनेर (बोटा) यांच्या वतीने आयोजित भव्यदिव्य काव्य सन्मान व पुरस्कार सोहळ्यात सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पर्यावरण प्रेमी श्री. राहुल राऊत यांना “पर्यावरण प्रेमी पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.
श्री. राहुल राऊत हे खऱ्या अर्थाने निसर्गप्रेमी असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. पर्यावरणाची हानी होऊ नये, प्रत्येकाने किमान पाच झाडे लावावीत, निसर्गावर प्रेम करावे आणि निसर्ग हाच खरा देव आहे, हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य ते निस्वार्थ भावनेने करीत आहेत. त्यांच्या या अविरत पर्यावरण संवर्धनाच्या प्रवासाला अधिक बळ मिळावे व समाजात नवचैतन्य निर्माण व्हावे, या उद्देशाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन कविता म्हणजे प्रबोधन प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमासाठी प्रतिष्ठाणचे आयोजक मा. गौतम भालेराव सर, नवनाथ सरोदे सर, ह. भ. प. कानवडे महाराज, प्रताप गुंजाळ सर, श्री. रवी काशिद, अशोककुमार शिंदे सर (अकोले) यांचे मोलाचे योगदान लाभले.
या काव्य सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला असून श्री. राहुल राऊत यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button