इतर

कु. पूर्वा जाजू – वाणिज्य शाखेत अकोले तालुक्यात प्रथम.

अकोल्याच्या निकालात मुलींनी मारली  बाजी 

अकोले – एच.एस.सी बोर्डाचा निकाल नुकताच लागला असून त्यामध्ये येथील कु. पूर्वा जाजू हिने 87.83% गुण प्राप्त करून अकोले तालुक्यात सर्वप्रथम आली आहे. तर मॉडर्न कॉलेज, अकोले च्या कला, वाणिज्य व शास्त्र विभागात देखील कु. पूर्वा ने प्रथम क्रमांक पटकविला आहे. 

कु. पूर्वा ज्योती धनंजय जाजु ही मॉडर्न हायस्कूल जूनियर कॉलेज अकोले ची विद्यार्थिनी असून तेथे विज्ञान, कला, वाणिज्य शाखेत “प्रथम”, तर वाणिज्य शाखेत “अकोले तालुक्यात सर्वप्रथम” येण्याचा बहुमान तिने पटकविला आहे. कु. पूर्वा पत्रकार अजय जाजू यांची पुतणी आहे.

मॉडर्न हायस्कूल  व जुनियर कॉलेज,  अकोले चा एकुण निकाल 93.90% लागला आहे. तर विभाग निहाय विज्ञान विभाग ९७.६५%,  कला विभाग 84.84% व वाणिज्य विभाग ९६.१५% असा निकाल लागला आहे. तिन्ही शाखेत मुलींनीच बाजी मारल्याचे दिसते. 

मॉडर्न कॉलेज च्या कला, वाणिज्य व विज्ञान विभागात प्रथम आलेली  पूर्वा धनंजय जाजू 87.83% ही वाणिज्य विभागात अकोले तालुक्यात देखील सर्वप्रथम आली आहे तर मॉडर्न कॉलेजमध्ये  वाणिज्य विभागात द्वितीय क्रमांक कृष्णा राजेंद्र अभंग 82.50% व तृतीय क्रमांक तृप्ती सूर्यभान गजे 82.33%  ने पटकाविला आहे. 

 विज्ञान विभागात गौरी विजय शेलार 82.67% ही सर्वप्रथम असून समीक्षा दत्तात्रय उतरडे 74.50%  व श्रुती भानुदास धुमाळ 73.67%  यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. 

 कला विभागात प्रतीक्षा किसन मालुंजकर 74.17%,   स्वातीया रशिद तांबोळी 67.17%,  व सपना सोमनाथ मेंगाळ 66.83%  यांनी प्रथम तीन मध्ये येण्याचा बहुमान मिळविला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button