इतर

आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना शहिद दिनानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहात आदरांजली

कल्याण प्रतिनिधी

आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या 178 व्या शहिद दिनानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहात आदरांजली वाहण्यात आली 2 मे 1848 रोजी आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना ठाणे मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आले होते त्या घटनेस 178 वर्षे पूर्ण झाली.त्यांच्या शहिद दिनानिमित्ताने आदरांजलीचा कार्यक्रम शासनातर्फे आयोजित करण्यात आला होता.


कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे होते यावेळी खासदार हेमंत सावरा,, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ ,आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे ,ठाणे मनपाचे उपमहापौर श्री.पाटील,ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री.सौरभ साव ,ठाणे ATC श्री.गोपीचंद कदम ,ठाणे मध्यवर्ती कारागृह प्रमुख श्रीम.राणी भोसले,श्री.लकीभाऊ जाधव सामाजिक कार्यकर्ते,श्री.विलास गवारी
श्री.सुनिल भांगरे,श्री.रामनाथ भोजणे, श्री.अशोक विरणक,गोविंद साबळे,डॉ.संतोष सुपे,डॉ. व्ही.व्ही पोपेरे , रमेश पवार ,दिगंबर नवाळे, भागाजी भांगरे , महाले साहेब, गावित साहेब, नगरसेवक किरण भांगले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रथम राघोजी भांगरे चौकात पुष्पांजली अर्पण करून तेथून मशाल घेऊन मिरवणूकीने सर्वजण ठाणे मध्यवर्ती कारागृहात पोहचले .तेथे क्रांतीवीर राघोजी भांगरे स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले व त्यानंतर कारागृहातील फाशी गेट जेथे क्रांतीवीर राघोजी यांना फाशी दिले होते तेथे प्रमुख मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.कारागृहाच्या बाहेरील आवारात कार्यक्रमासाठी मंडप शासनातर्फे उभारण्यात आला होता.अभिवादन कार्यक्रमात ठाणे ATC श्री.कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या नावाने सुरु केलेल्या शिष्यवृत्ती व आदिवासी विकास विभागातर्फे सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.त्यांनतर ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री.सौरभ साव यांनी क्रांतीवीर राघोजीबद्दल माहिती सांगितली,आमदार श्री.संजय केळकर यांनी राघोजीच्या स्मारकासाठी आमदार निधी आवश्यकता असल्यास देण्याचे आश्वासन दिले,त्यानंतर आदिवासी सेवा मंडळ,मुलुंड पश्चिम,मुंबई या संस्थेचे सचिव व क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या घराण्यातील वारसदार श्री.सुनिल सोमनाथ भांगरे यांनी क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे ठाणे कारागृहातील स्मारक होण्यासाठी तत्कालीन आदिवासी विकास मंत्री कै.मधुकरराव पिचड ,आदिवासी संशोधक कै.श्री.गोविंद गारे , कै.लक्ष्मण साबळे ,श्री.सुनिल भांगरे,श्री.रामनाथ भोजणे यांच्या संघर्षाची माहिती दिली व क्रांतीविरांचा अर्धपुतळा कारागृहातील स्मारकाशेजारी बसविण्याची मागणी केली.आदिवासी साहित्य लेखक श्री.विलास गवारी यांनी राघोजी भांगरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.त्यानंतर आदिवासी विकास मंत्री श्री.अशोक उईके यांनी समाजाची एकजूट राखण्याचे आवाहन करतानाच पुढील वर्षी दिवसभराचा हा आदरांजली कार्यक्रम शासनातर्फे व्हावा तसेच जयंतीचाही कार्यक्रम व्हावा .सर्व आदिवासी क्रांतीवारींची माहिती पुस्तकरूपाने शासनातर्फे प्रसिध्द व्हावी,विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात याव्यात यासाठी शासनाने कार्य करा सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रामनाथ भोजणे यांनी केले व आभार श्री.अशोक इरनक यांनी मानले

या कार्यक्रमासाठी ठाणे,पालघर,कल्याण, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत,कसारा ठाणे, पुणे, अहिल्या नगर, नाशिक या जिल्ह्यातून अनेक आदिवासी बांधव तसेच

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,मुंबई , गोंडवाना मित्र मंडळ मुंबई,महादेव कोळी मित्र मंडळ मुंबई, वारली सेवा संघ, ठाकर समाज सेवा संघ कोकण, कोकणी समाज सेवा संघ,श्रमिक संघटना, अशा अनेक संस्था सन्घटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते कार्यक्रमासाठी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button