पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रश्नावर अधिवेशनात आवाज उठविण्यासाठी संघटनेने घेतली आमदार लहामटे यांची भेट

अकोले प्रतिनिधी
पोल्ट्री व्यवसायिक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तसेच पोल्ट्री व्यवसायिकांची कंपन्यांकडून होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून आवाज उठवण्यात यावा यासाठी संगमनेर- अकोले तालुका पोल्ट्री योद्धा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ किरण लहामटे यांची भेट घेतली व निवेदन दिले
मागील तीन वर्षात महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक शासन निर्णय मंजूर झाले. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. एकतर्फी करारनामा करून महाराष्ट्रामध्ये अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत.
यावर्षीच्या मार्च,एप्रिल, मे आणि जून या महिन्यातील सगळ्याच कंपन्यांचेमहाराष्ट्रातील 90% कुक्कुटपालक शेतकऱ्यांच्या बॅचेस फेल गेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातमोठा असंतोष निर्माण झाला आहे. कारण बरेच शेतकऱ्यांना मेहनतीचा मोबदला खूप कमी मिळाला आहे. आणि काही कंपन्यांनी तर शेतकऱ्यांच्या अंगावरतीच पेमेंट काढला आहे म्हणजेच मायनस पेमेंट काढले आहे. या दरम्यान कंपनीने मात्र त्यांच्या मालाला 110 ते 140 रुपये भाव घेऊन मार्केटमध्ये विकला आहे त्यामुळे त्यांचा कोणताही प्रकारचा नुकसान.झालेलं नाही. तरी देखील करारनाम्यातील जाचक अटी व दिलेल्या कोऱ्या चेकच्या दबावामुळे शेतकऱ्यांच शोषण करीत आहेत. या सर्व परिस्थितीवर मार्ग निघावा म्हणून.22जुलै 2024 रोजी शेतकऱ्यां बरोबर एकतर्फी करारनामा न करता तो करार केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार करारनामा रजिस्टर करण्यात यावा असे सुद्धा बंधनकारक.आहे. त्याकरिता महाराष्ट्र शासनाने देखील शासन निर्णय पारित केला आहे. त्या शासन निर्णयांची आतापर्यंत अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे आजही कंपन्या शेतकऱ्यांकडून कोरे चेक घेऊन त्यांची फसवणूक करत आहेत.
22 जुलै 2024 ला आणखीन एक शासन निर्णय मंजूर केला त्यामध्ये पशुखाद्य ज्या कंपन्या विक्री करतात त्यांनी आपल्या खाद्याच्या गोणीवरती अन्न घटकाची ठळकपणे नोंद करणे हे बंधनकारक आहे. परंतु त्याची सुद्धा अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही.
31 जुलै 2025 ला महाराष्ट्र शासनाने पशुसंवर्धन ला कृषी समकक्ष दर्जा दिला परंतु त्याची सुद्धा अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही. शासन निर्णय अंमलबजावणी करण्यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी फक्त आदेश काढतात परंतु तालुका व जिल्हा लेवलचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ज्या पशुखाद्य तयार करणाऱ्या कंपन्या आहे त्यांची पशुसंवर्धन विभागाकडे आजपर्यंत रजिस्टर नोंद झालीच नाही. जर झाली असेल तर ती पशुसंवर्धन विभागाने उघडपणे प्रत्येक जिल्हा निहाय जाहीर करावी. कुकूटपालक हिताचे शासन निर्णय होतात त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची त्या संदर्भात जिल्हास्तरावरी व तालुकास्तरावरचे जे पशुसंवर्धन अधिकारी यांना पूर्ण माहिती दिली जात नाही. त्यामुळे ते त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. असे सुद्धा निर्देशनात आले आहे. शासन निर्णयामध्ये काही तांत्रिक त्रुटी असेल तर त्याची सुद्धा आपण दुरुस्ती करून ते शासन निर्णय कसे प्रभावीपणे अमलात येतील त्यासाठी प्रयत्न प्रशासनाने मागील दोन वर्षांत केले नाही. प्रशासने फक्त त्यामध्ये पळवाटा शोधायचा प्रयत्न केला जात आहे महाराष्ट्रातील लाखो पशुपालक शेतकऱ्यांना आता वाटत आहे. पशुखाद्य बनविणाऱ्या तसेच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणाऱ्या बहुतांशी कंपन्यांची पशुसंवर्धन विभागाकडे नोंद नाही त्या मोठ्या कंपन्यांचा पशुसंवर्धन विभागावरती काय दबाव आहे का त्या संदर्भात सुद्धा आपण खुलासा करावा. पशुसंवर्धन विभागातील काही अधिकाऱ्यांचे कंपन्यांच्या बरोबर काही हितसंबंध आहेत का असे सुद्धा महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात संशय आहे. ते सुद्धा आपण माहिती घेऊन त्यावर मार्ग काढावा ही विनंती. पशुधनाची वाढ होण्यासाठी शासनातर्फे नवनवीन योजना आणल्या जातात त्याकरिता शासनाचा मानावे तेवढे आभार कमीच आहेत परंतु त्या योजना तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर अस्तित्वात असणारे पोल्ट्री फार्म बंद होत आहेत आणि काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत त्याची कारणे शोधून त्यावर काहि मार्ग काढता येईल का याचा देखील विचार व्हावा. येत्या काही दिवसात शासन निर्णयाची अंमलबजावणी जर झाली नाही व पशुखाद्य तयार करणाऱ्या कंपन्यांकडून खराब दर्जाचे पशुखाद्य व पिल्लांची चढा दराने विक्री होत असेल आणि शेतकऱ्यांचीफसवणूक झाली तर त्याच्या विरोधात हजारो शेतकऱ्यांची पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्याची तयारी करत आहे.
यामध्ये विशेष लक्ष घालून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली यावेळी महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे संघटक व संगमनेर -अकोले तालुका पोल्ट्री असो.शियशन चे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांचे सह संगमनेर अकोले तालुक्यातील पोल्ट्री व्या व सायिक शेतकरी उपस्थित होते



